Raisina Dialogue | रायसिना संवादाला आजपासून सुरुवात, पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधन
आजपासून सहाव्या रायसिना संवादाच्या (Raisina Dialogue) कार्यक्रमाला सुरुवात होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) या कार्यक्रमाचे उद्धाटन करणार आहेत.

नवी दिल्ली : आजपासून सहाव्या राससिना डायलॉग (Raisina Dialogue)अर्थात रायसिना संवादाला सुरुवात होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी एका व्हिडीयो संदेशाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे उद्धाटन करणार आहेत. या संवादात जगभरातील जवळपास 50 देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे 150 प्रतिनिधी भाग घेणार आहेत. भारतात दरवर्षी होणाऱ्या रायसिना संवादाकडे जागतिक समुदायाचे लक्ष लागलेले असते.
Pose your questions and ideas on this thread; best ones will win memorabilia from #Raisina2021
— Raisina Dialogue (@raisinadialogue) April 12, 2021
Register ➡ https://t.co/7VphXXsSxO https://t.co/NLJZToK8i9
भारतात परराष्ट्र मंत्रालय आणि ऑब्जर्व्हर रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतंय. आजपासून सुरू होणाऱ्या या संवादात फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, रवांडा, डेनमार्क, जपान, सिंगापूर या देशांसोबत एकूण 14 देशांचे मंत्री भाग घेणार आहेत. हा कार्यक्रम 13 ते 16 एप्रिल या दरम्यान पार पडणार आहे. या वर्षीच्या रायसिना डॉयलॉगची थीम “#ViralWorld: Outbreaks, Outliers and Out of Control” अशी आहे.
Join us online at #Raisina2021 tomorrow onwards
— ORF (@orfonline) April 12, 2021
Register ➡ https://t.co/qV7EqF2yie
Watch it LIVE on the following Social Media Channels:
Twitter — @orfonline
Facebook — https://t.co/zy36VYYAtk
YouTube — https://t.co/WPEUeiMzhp
LinkedIn — https://t.co/m42a41T21x pic.twitter.com/R3j7yqpo2M
भारतात 2016 पासून रायसिना डायलॉगची सुरुवात झाली असून जगाच्या भू-राजकीय आणि भू-आर्थिक विषयांशी संबंधित तसेच जागतिक राजकारण, व्यापार, माध्यमं अशा अनेक विषयांवर या कार्यक्रमात चर्चा केली जाते. भारताच्या राष्ट्रपतींचे निवासस्थान, राष्ट्रपती भवन हे रायसिना हिलवर असल्याने या संवाद कार्यक्रमाला राससिना डॉयलॉग म्हटलं जातं. सिंगापूरमध्ये दरवर्षी होणाऱ्या शांग्री-ला डॉयलॉगच्या धर्तीवर भारतात रायसिना डॉयलॉग सुरू करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Coronavirus Update : कोरोनाच्या प्रादुर्भावात काहीसा दिलासा; देशात 24 तासांत 97 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त
- Pandharpur Bypoll | 'हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानंही पडणार नाय'; आनंद शिंदें यांचं गाण्यातून फडणवीस यांना उत्तर
- India Pakistan War | येत्या पाच वर्षात भारत-पाकिस्तानमध्ये मोठ्या युद्धाची शक्यता; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खात्रीलायक अहवाल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
