एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पेट्रोल-डिझेल दरवाढीचा बारावा दिवस, अमरावतीत सर्वात महाग
देशात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल महाराष्ट्रात आहे. अधिक स्पष्ट करायचं झालं तर अमरावतीत देशातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेल आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारवर इंधन दरवाढीविरोधात टीकेची झोड उठलेली असताना, कर्नाटक निवडणुकीनंतर आज सलग बाराव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत.
आज पेट्रोल 36 पैशांनी तर डिझेल 22 पैशांनी महागलं आहे. देशात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल महाराष्ट्रात आहे. अधिक स्पष्ट करायचं झालं तर अमरावतीत देशातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेल आहे.
अमरावतीतील पेट्रोलचा आजचा दर 86.98 रुपये तर डिझेल 74.33 रुपये आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच राहणार : केंद्र सरकार
तर मुंबईत आज पेट्रोल 85 रुपये 65 पैशांनी मिळत आहे. तर डिझेलचे दर 73 रुपये 18 पैसे आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर 77 रुपये 83 पैशांवर पोहोचला आहे.
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे देशात ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत. परंतु दरांवर नियंत्रण आणण्यात सरकारला आतापर्यंत यश आलेलं नाही.
कर्नाटक निवडणुकीनंतर इंधर दर चढेच
कर्नाटक निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. कर्नाटक निवडणुकीच्या काही दिवस आधी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. त्यानंतर मागील 12 दिवसात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सतत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.
देशात सर्वात महाग पेट्रोल अमरावती, औरंगाबादमध्ये!
इंधन दरवाढ होणारच : केंद्र सरकार
देशात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता मावळली आहे. सोईसुविधांसाठी दरवाढ होतच राहणार असल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले आहे.
वाढत्या इंधन दरवाढीबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, दिलासा तर नाहीच पण पेट्रोल दरवाढीबाबत मोठा झटका बसला आहे.
संबंधित बातम्या
इंधन दरात दहाव्या दिवशी वाढ, देशात सर्वात महाग पेट्रोल अमरावतीत
पाकिस्तानपेक्षा भारतात पेट्रोल 33 रुपये प्रति लिटरने महाग कशामुळे?
... तर पेट्रोल 53 रुपये आणि डिझेल 41 रुपये लिटरने मिळेल
पेट्रोल-डिझेलची आगेकूच, स्वत:चा विक्रम मोदींनी अनेकवेळा मोडला!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement