तिहार जेलमध्ये निर्भयाच्या दोषींच्या फाशीची तालिम; 22 जानेवारीला देण्यात येणार फाशी
तालिम दरम्यान 4 पोत्यांमध्ये चार दोषींच्या वजनाएवढी माती आणि दगड भरलेले होते. ही पोती दोरीला लटकवण्यात आली. फाशीची तालिम जेलमध्ये सुप्रिटेंडच्या उपस्थित होते.
नवी दिल्ली : तिहार जेलमध्ये निर्भयाच्या दोषींसाठी फाशीची तयारी करण्यात येत आहे. या नराधमांना फाशी देण्याआधी रविवारी तिहार जेलमध्ये फाशी देण्याची तालिम देण्यात आली. तिहारच्या जेल नंबर 3 मध्ये फाशीची पूर्ण तालिम करण्यात आली. निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश सिंह, विनय शर्मा, अक्षय ठाकूर आणि पवन गुप्ता यांना 22 जानेवारी रोजी फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे.
कशी झाली फाशीची तालिम?
तालिम दरम्यान 4 पोत्यांमध्ये चार दोषींच्या वजनाएवढी माती आणि दगड भरलेले होते. ही पोती दोरीला लटकवण्यात आली. फाशीची तालिम जेलमध्ये सुप्रिटेंडच्या उपस्थित होते. या तालमिमध्ये जल्लाद उपस्थित नव्हता.
का आवश्यक असते तालिम?
दरम्यान, फाशीच्या आधी तालिम अत्यंत आवश्यक असते. फाशीची तालिम करताना ज्या रश्शीच्या सहाय्याने फाशी देण्यात येते ती तपासून पाहिली जाते. ज्यामध्ये रश्शी दोषीचं वजन झेलू शकते की, नाही हे पाहण्यात येतं. यादरम्यान दोषींच्या बरोबरीचं वजन असणारी एखादी वस्तू अर्ध्या तासापर्यंत फाशीवर लटकवण्यात येते.
14 जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी
निर्भया बलात्कार प्रकरणात फाशीची शिक्षा मिळणाऱ्या चारपैकी दोन दोषींच्या समिक्षा याचिकेवर 14 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी करण्यात येणार आहे. न्यायाधीश एन. वी. रमणा, न्यायाधीश अरुण मिश्रा, न्यायाधीश आर. एफ. नरीमन, न्यायाधीश आर. भानुमती आणि न्यायाधीश अशोक भूषण यांचं खंडपीठ विनय शर्मा आणि मुकेश यांच्याकडून विनय शर्मा आणि मुकेश सिंह यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या सुधारित याचिकेवर सुनावणी करण्यात येणार आहे.
काय आहे निर्भया गँगरेप प्रकरण?
- सात वर्षांपूर्वी म्हणजेच 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला होता. - सिनेमा पाहून आल्यानंतर मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते. - त्यांनी निर्भयासोबत छेडछाड करायला सुरुवात केली. विरोध केल्याने आरोपींनी तिच्या मित्राला एवढी मारहाण केली की तो बेशुद्ध झाला. - यानंतर एकटीच असलेल्या निर्भयावर सहा नराधमांनी धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला. एवढंच नाही तर अनन्वित अत्याचार केले. - तरुणीला गंभीर जखमी केल्यानंतर नराधमांनी दोघांना दक्षिण दिल्लीच्या महिपालपूरजवळच्या वसंत विहार परिसरात धावत्या बसमधूनच रस्त्यावर फेकलं. - दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. - मात्र 29 डिसेंबर रोजी उपचारांदरम्यान माऊंट एलिझाबेथ रुग्णालयातच तिने अखेरचा श्वास घेतला.
दरम्यान, पवन गुप्ता, मुकेश सिंह, अक्षय ठाकूर आणि विनय शर्मा अशी या चार दोषींची नावं आहेत. तर या प्रकरणातील राम सिंह नावाच्या आरोपीने तिहार तुरुंगातच आत्महत्या केली होत. याशिवाय एक आरोपी अल्पवयीन असल्याने, ज्युवेनाईल कोर्टाने त्याला तीन वर्षांची शिक्षा ठोठावत त्याची रवानगी बालसुधारगृहात केली होती. 2015 रोजी त्याची सुटका झाली. त्यानंतर चारही दोषींनी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. परंतु, सुप्रीम कोर्टाने यांच्या पुनर्विचार याचिका फेटाळल्या होत्या.
संबंधित बातम्या :
निर्भया प्रकरणातील एका दोषीची सुप्रीम कोर्टात सुधारित याचिका; फाशीला स्थगिती देण्याची मागणी
निर्भयाच्या दोषींची फाशी लाईव्ह दाखवा; 'परी' संस्थेची मागणी
निर्भयाच्या दोषींविरोधात न्यायालयाने जारी केलेलं 'डेथ वॉरंट' आहे तरी काय?