![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
निर्भयाच्या दोषींविरोधात न्यायालयाने जारी केलेलं 'डेथ वॉरंट' आहे तरी काय?
राजधानी दिल्लीत 2012मधील निर्भया गँगरेपमुळे संपूर्ण देश हळहळला होता. अखेर या प्रकरणातील दोषींच्या फाशीच्या तारखेवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने निर्भयाच्या चारही दोषींच्या डेथ वॉरंटला मंजूरी दिली आहे
![निर्भयाच्या दोषींविरोधात न्यायालयाने जारी केलेलं 'डेथ वॉरंट' आहे तरी काय? Nirbhaya Rape Case What is the death warrant going to be released to the criminals of nirbhaya निर्भयाच्या दोषींविरोधात न्यायालयाने जारी केलेलं 'डेथ वॉरंट' आहे तरी काय?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/07203012/nirbhaya-02.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : निर्भयाच्या दोषींच्या विरोधात 'डेथ वॉरंट' जारी करण्यात आलं आहे. डेथ वॉरंटला फॉर्म नंबर 42 असंही म्हटलं जातं. कोणत्याही प्रकरणातील दोषींना जेव्हा मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात येते. त्यावेळी कोर्ट हे वॉरंट जारी करतं. निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व दोषींच्या विरोधात दिल्ली पटियाला हाऊस कोर्टाने डेथ वॉरंट जारी केलं आहे.
16 डिसेंबर 2012 रोजी निर्भया ज्या बसने प्रवास करत होती, त्याच बसमध्ये तिच्यावर काही नराधमांनी बलात्कार केला होता. या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून या नराधमांना फाशी देण्याच्या मागणीने जोर धरला होता. याच प्रकरणी दिल्ली पटियाला हाऊस कोर्टाने डेथ वॉरंट जारी करत दोषींच्या फाशीची तारिख निश्चित केली आहे. जाणून घेऊया डेथ वॉरंट म्हणजे काय?
कोणत्याही दोषीला ज्यावेळी न्यायालयाकडून मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात येते, त्यावेळी त्याच्या विरोधात डेथ वॉरंट जारी करण्यात येतं. या वॉरंटला दंड प्रक्रिया संहिता म्हणजेच, सीआरपीसीचा फॉर्म नंबर 42 असंही म्हटलं जातं. ज्यामध्ये दोषींना फाशीची शिक्षा ठोठावण्याचा आदेश दिला जातो. याला क्रिमिनल प्रोसिजरच्या फॉर्म नंबर 42 च्या छापलेल्या तीन वाक्यांच्या दुसऱ्या भागाचा हिस्सा मानला जातो. तसेच याला ब्लॅक वॉरंट असंही म्हटलं जातं. कायद्याच्या भाषेत या फॉर्म 42 ला 'वॉरंट ऑफ एक्जीक्यूशन ऑफ ए सेंटेंस ऑफ डेथ' असं म्हटलं जातं.
न्यायालयाने जारी केलेलं हे वॉरंट जेल प्रशासनाच्या त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला पाठवण्यात येतं. जिथे दोषींना कैदेत ठेवण्यात आलं आहे. या वॉरंटमध्ये दोषींच्या नावासोबतच त्यांला ठोठावण्यात आलेली मृत्यूदंडाची शिक्षा सुनिश्चित करण्यात आलेली असते. यामध्ये फाशी देण्याची वेळ आणि स्थळदेखील सांगण्यात आलेलं असतं. तसेच शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधिशांची स्वाक्षरीही असते. या वॉरंटनंतर दोषींना तोपर्यंत फासावर लटकवून ठेवण्यात येतं जोपर्यंत त्या दोषीचा मृत्यू होत नाही.
संबंधित बातम्या :
निर्भयाच्या दोषींना फाशीच; 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता शिक्षेवर अंमलबजावणी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)