एक्स्प्लोर

निर्भया प्रकरणातील एका दोषीची सुप्रीम कोर्टात सुधारित याचिका; फाशीला स्थगिती देण्याची मागणी

निर्भया सामुहिक बलात्कारप्रकरणातील चार दोषींपैकी एका दोषीनं सुप्रीम कोर्टात सुधारित याचिका दाखल केली आहे. क्यूरेटिव याचिकेच्या माध्यमातून दोषी विनय कुमार शर्माने फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी केली आहे.

नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना न्यायालयानं फाशीची सिक्षा सुनावली असून त्यांच्या फाशीची तारिखही निश्चित करण्यात आली आहे. परंतु, चार दोषींपैकी एका दोषीनं सुप्रीम कोर्टात सुधारित (क्युरेटिव्ह) याचिका दाखल केली आहे. सुधारित याचिकेच्या माध्यमातून दोषी विनय कुमार शर्माने फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. याआधी 7 जानेवारीला दिल्लीतल्या पटियाला हाऊस न्यायालयानं निर्भया प्रकरणातील सर्व आरोपींच्या फाशीची तारिख निश्चित केली असून निर्भयाच्या चारही दोषींच्या डेथ वॉरंटला मंजूरी दिली आहे.

निर्भया सामुहिक बलात्कारप्रकरणी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने याप्रकरणातील चारही आरोपींविरोधात डेथ वॉरंट जारी केलं आहे. या चारही आरोपींची फाशी कायम ठेवण्यात आली असून 22 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता त्यांना फाशी देण्यात येणार आहे. निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपी मुकेश, विनय शर्मा, अक्षय कुमार सिंह आणि पवन गुप्ता यांना कोर्टाने यापूर्वीच फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. हे चौघेही तिहार तुरुंगात होते. त्यांच्या डेथ वॉरंटवर दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने त्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवत तारिख निश्चित केली आहे.

पाहा व्हिडीओ : निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना 22 जानेवारीला फाशी

काय आहे निर्भया गँगरेप प्रकरण? - सात वर्षांपूर्वी म्हणजेच 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला होता. - सिनेमा पाहून आल्यानंतर मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते. - त्यांनी निर्भयासोबत छेडछाड करायला सुरुवात केली. विरोध केल्याने आरोपींनी तिच्या मित्राला एवढी मारहाण केली की तो बेशुद्ध झाला. - यानंतर एकटीच असलेल्या निर्भयावर सहा नराधमांनी धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला. एवढंच नाही तर अनन्वित अत्याचार केले. - तरुणीला गंभीर जखमी केल्यानंतर नराधमांनी दोघांना दक्षिण दिल्लीच्या महिपालपूरजवळच्या वसंत विहार परिसरात धावत्या बसमधूनच रस्त्यावर फेकलं. - दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. - मात्र 29 डिसेंबर रोजी उपचारांदरम्यान माऊंट एलिझाबेथ रुग्णालयातच तिने अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान, पवन गुप्ता, मुकेश सिंह, अक्षय ठाकूर आणि विनय शर्मा अशी या चार दोषींची नावं आहेत. तर या प्रकरणातील राम सिंह नावाच्या आरोपीने तिहार तुरुंगातच आत्महत्या केली होत. याशिवाय एक आरोपी अल्पवयीन असल्याने, ज्युवेनाईल कोर्टाने त्याला तीन वर्षांची शिक्षा ठोठावत त्याची रवानगी बालसुधारगृहात केली होती. 2015 रोजी त्याची सुटका झाली. त्यानंतर चारही दोषींनी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. परंतु, सुप्रीम कोर्टाने यांच्या पुनर्विचार याचिका फेटाळल्या होत्या.

संबंधित बातम्या : 

निर्भयाच्या दोषींना फाशीच; 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता शिक्षेवर अंमलबजावणी

निर्भयाच्या दोषींविरोधात न्यायालयाने जारी केलेलं 'डेथ वॉरंट' आहे तरी काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
Video: कोणत्या राष्ट्रवादीचे विलिनीकरण, तुम्ही सत्तेत जाणार होतात का? अमोल कोल्हेंनी दिलं डायनामिस्क उत्तर
Video: कोणत्या राष्ट्रवादीचे विलिनीकरण, तुम्ही सत्तेत जाणार होतात का? अमोल कोल्हेंनी दिलं डायनामिस्क उत्तर
केमिकल कारखान्यातील भीषण स्फोटात 8 कामगार जिवंत जळाले; गेटला कुलूप लावून अवैध फटाक्यांची निर्मिती; बचाव पथकाने अवयवांचे तुकडे गोळा करून प्लास्टिक पिशवीत भरले
केमिकल कारखान्यातील भीषण स्फोटात 8 कामगार जिवंत जळाले; गेटला कुलूप लावून अवैध फटाक्यांची निर्मिती; बचाव पथकाने अवयवांचे तुकडे गोळा करून प्लास्टिक पिशवीत भरले

व्हिडीओ

Eknath Shinde PC : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही
Nilesh Rane Vs Ganesh Naik : नाईकांच्या शिंदे पिता-पुत्रांवरील टीकेला निलेश राणेंचं प्रत्युत्तर
Kolhapur ZP Election : कोल्हापूर झेडपीत मोठा भाऊ कोण? भाजप-राष्ट्रवादीत जुंपली
Sukesh Chandrashekhar News : तुरुंगातूनच जॅकलिनला 'व्हॅलेंटाईन' गिफ्ट; सुकेश चंद्रशेखरकडून थेट आलिशान हेलिकॉप्टर भेट!
Satara Crime News: 'व्हॅलेंटाईन डे'ला शिक्षकाने विद्यार्थिनीला केलं प्रपोज; म्हणाला, मी तुला चार दिवस

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cancer : फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
Ind vs Pak :भारताविरुद्ध पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, वकार युनूस यांनी सलमान आगाचं काय चुकलं ते सांगितलं, उस्मान तारिकबाबत म्हणाले....     
सूर्याचं कौतुक, सलमान आगाचं काय चुकलं ते सांगितलं, मॅच पाकिस्तानच्या हातून कधी निसटली, वकार युनूस म्हणाले...  
Share Market: सेन्सेक्समध्ये 650 अंकांची उसळी, निफ्टी 25650 अंकांच्या पार, गुंतवणूकदारांनी एका दिवसात 3 लाख कोटी कमावले
सेन्सेक्समध्ये 650 अंकांची उसळी, निफ्टी 25650 अंकांच्या पार, गुंतवणूकदारांनी एका दिवसात 3 लाख कोटी कमावले

Embed widget