एक्स्प्लोर
दुबईतील बुर्ज खलिफासारखीच असेल पोर्ट ट्रस्टची इमारत

मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टच्या विकासासाठी 5 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितिन गडकरी यांनी दिली. मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी दुबईतील बुर्ज खलिफापेक्षा उंच इमारत मुंबई पोर्ट ट्रस्टसाठी उभारली जाईल असं स्पष्ट केलं आहे.
"मुंबईला जगाच्या नकाशावर योग्य जागा मिळवून देण्यासाठी या पोर्टचा उपयोग होणार आहे. तसंच दुबईतील बुर्ज खलिफा किंवा सिंगापूरमधील वॉटरफ्रंटसारखाच या नव्या पोर्ट ट्रस्टच्या इमारतीचा आराखडा असेल," असंही नितिन गडकरी यावेळी म्हणाले.
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या 1800 एकर जागेपैकी 500 एकर जागेवर विविध विकासकामं करण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय विशेषज्ञांकडून याचा मास्टरप्लॅन बनवण्यात येणार आहे. या विकासकामांमध्ये केंद्र सरकारच्या ऑफिससाठी एक इमारत बांधण्यात येणार आहे. तसंच मरिना, वॉकवे, इको पार्क, एंटरटेनमेंट हब, स्केटिंग रिंग आणि इतर गोष्टींची उभारणीही करण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
पुणे
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
