Morning Headlines : देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, मॉर्निंग न्यूज एका क्लिकवर
देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
बम भोले! उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराची कवाडं उघडली, 20 क्विंटल फुलांनी मंदिराची सजावट
भारतात 12 ज्योर्तिलिंगांना विशेष महत्त्व आहे. चारधाम (chardham) यात्रा करणे हे देखील भारतीय संस्कृतीत पवित्र मानले जाते. केदारनाथ (kedarnath) हे चारधाम यात्रेतील एक धाम असून 12 ज्योर्तिलिंगापैकी खूप महत्त्वाचे मानले जाते. केदारनाथ मंदिरातील कवाडं सहा महिन्याच्या शीतकालीन कालावधीनंतर सोमवारी पहाटे 6.20 वाजता उघडली. वाचा सविस्तर
पुढच्या दोन दिवसात उत्तर भारतात पावसाची शक्यता; वाचा हवामान विभागाचा अंदाज
देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कठे उन्हाचा कडाका जाणवत आहे तर कुठे अवकाळी पाऊस पडत आहे. उत्तर भारतात (North india) सध्या तापमानात वाढ झाली असून, त्याचा परिणाम म्हणून काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पुढच्या एक ते दोन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. वाचा सविस्तर
पंतप्रधान मोदी आज केरळसह दादरा नगर हवेली दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज केरळ तसेच दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीवच्या दौऱ्यावर आहेत. सिल्वासामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन होणार आहे. तसेच केरळमधील पहिल्याच वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान आज हिरवा झेंडा दाखवतील. वाचा सविस्तर
मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या बहिणीने पोलिसांना कानाखाली मारलं, थेट जेलमध्ये रवानगी!
वायएसआर तेलंगणा पक्षाच्या नेत्या आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या बहिण वायएस शर्मिला यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. सोमवारी (24 एप्रिल) आंदोलनादरम्यान एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत कानाखाली मारल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वाचा सविस्तर
अमेरिकन एअरलाईन्सच्या विमानात सहप्रवाशावर लघुशंका; विकृत कृत्याने सर्वत्र संताप
अलीकडच्या काळात विमानातील प्रवाशांच्या असभ्य वर्तनाच्या घटना समोर येत आहेत. विमानात सहप्रवाशाच्या अंगावर लघवी करण्याचे प्रकार अद्यापही सुरूच आहेत. अमेरिकन एअरलाईन्सच्या न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या प्रवाशाने सहप्रवाशावर लघुशंका केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. वाचा सविस्तर
World Malaria Day 2023 : आज जागतिक मलेरिया दिन; वाचा या दिनाचा इतिहास आणि महत्त्व
आज जागतिक मलेरिया दिन (World Malaria Day). मलेरिया हा डासांच्या चावण्यामुळे होणारा रोग आहे. जागतिक स्तरावर दरवर्षी मलेरिया दिन 25 एप्रिल रोजी मलेरिया नियंत्रित करण्यासाठी पाळण्यात येतो. जागतिक आरोग्य असेंब्लीच्या 60 व्या सत्रामध्ये मे 2007 मध्ये हा दिन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. वाचा सविस्तर
सुएझ कालव्याची पायाभरणी, ब्लॅक अॅण्ड व्हाईट दूरदर्शन रंगीत झाला; आज इतिहासात...
इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व आहे. आज 25 एप्रिल रोजीदेखील इतिहासात काही महत्त्वाच्या घडामोडी झाल्या आहेत. या घडामोडींचा देशाच्या, जगाच्या राजकारणावरही परिणाम झाला. आजचा दिवस आरोग्य जागरुकतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आज जागतिक मलेरिया दिवस आहे. मलेरिया आजाराने जगभरात लाखो नागरिकांचा मृत्यू होतो. त्यामुळे मलेरियाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक मलेरिया दिवस साजरा केला जातो. जगाच्या अर्थकारणाला नवं वळण देणाऱ्या सुएझ कालव्याची पायाभरणीदेखील आजच्या दिवशी झाली. वाचा सविस्तर
मिथुन, कन्या आणि तूळ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, वाचा आजचं राशीभविष्य
आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. आजचा दिवस मिथुन, कन्या आणि तूळ राशींच्या लोकांसाठी विशेष असणार आहे. या राशींच्या लोकांना आज आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या राशीबाबत नेमकं काय भाकित केलं आहे? याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत. जाणून घेऊयात सविस्तर आजचं राशीभविष्य