(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raju Shetti : राजू शेट्टींचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय अंगलट; 'स्वाभिमानी'मधील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची सोडचिट्टी
स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालिंदर पाटील, सावकार मादनाईक, जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, वैभव कांबळे यांच्यासह पदाधिकारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कारभारावर नाराज झाले आहेत.
Swabhimani Shetkari Sanghatana : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांना बालेकिल्ल्यात हादरे सुरुच आहेत. प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर आता प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजू शेट्टी यांना धक्का दिला आहे. राजू शेट्टी यांचा तिसऱ्या आघाडी सोबत जाण्याचा निर्णय राजू शेट्टींच्या अंगलट आला असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी राजू शेट्टींना सोडचिट्टी दिली आहे. विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता तिसऱ्या आघाडीचे संधान बांधल्याने राजू शेट्टी सोडचिट्टी दिली आहे.
स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालिंदर पाटील, सावकार मादनाईक, जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, वैभव कांबळे यांच्यासह पदाधिकारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कारभारावर नाराज झाले आहेत. ठाकरे गटातील दोन माजी खासदारांना स्वाभिमानीत घेऊन शिरोळ आणि हातकणंगलेत उमेदवार दिली असताना राजू शेट्टी यांना पदाधिकाऱ्यांच्या सोडचिट्टीने धक्का बसला आहे. सावकार मादनाईक यांनी 2019 मध्ये शिरोळ विधानसभेला निवडणूक लढवताना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती.
राजकारणात आमची पिछेहाट का झाली?
पत्रकामध्ये म्हटलं आहे की, राजू शेट्टी यांनी तिसरी आघाडी करून या निवडणुकीला सामोरे जाण्याचा घेतलेला निर्णय हा आम्हा पदाधिकाऱ्यांना अमान्य आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत यापेक्षाही सक्षम प्रयोग 'रिडालोस'चा अयशस्वी ठरला होता. गेल्या 25 वर्षात संघटनेतील अनेकांनी लाट्या काठ्या खाल्ल्या. जेलमध्ये गेले. मात्र राजकारणात आमची पिछेहाट का झाली? याचे चिंतन व्हायला पाहिजे. महायुती आणि महाविकास आघाडीचे दोन सक्षम पर्याय आज निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही महायुतीला सहकार्य करण्याची भूमिका घेत आहोत.
महायुती सरकारने साडेसात एचपीपर्यंतच्या मोटरपंपाना दिलेली वीजमाफी, 2019 ते 2025 पर्यंत पाणीपुरवठा संस्थांना दिलेली वीज सवलत, उच्च दाबासाठी 1.16 पैसे आणि लघुदाबासाठी प्रति युनिट एक रुपये जाहीर करून 1250 ते 1300 पाणीपुरवठा संस्था पश्चिम महाराष्ट्रात आहेत. उर्वरित महाराष्ट्रात 600 ते 700 संस्था आहेत. महाराष्ट्रातील दहा लाख शेतकऱ्यांना योजनेचा फायदा होणार आहे. महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजना 45000 गावांना पाणंद रस्ते, वीज बिलात 30 टक्के कपात करून सौर उर्जा योजनेवर दिलेला भर, शिवाय साखरेचा हमीभाव 3100 रुपये होता तो किमान चार हजार रुपये व्हायला हवा असे अनेक शेतकरी हिताचे निर्णय त्यांनी घेतल्यामुळे आम्ही महायुतीला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या