PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी आज केरळसह दादरा नगर हवेली दौऱ्यावर, केरळमधील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला दाखवणार हिरवा झेंडा
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज केरळसह दादरा नगर हवेली दौऱ्यावर आहेत. ते आज केरळमध्ये वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज केरळ तसेच दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीवच्या दौऱ्यावर आहेत. सिल्वासामध्ये (Silvassa) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन होणार आहे. तसेच केरळमधील पहिल्याच वंदे भारत एक्सप्रेसला (Vande Bharat Express) पंतप्रधान आज हिरवा झेंडा दाखवतील. तिरुअनंतपुरम ते कासारगोड दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस आजपासून धावणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची सिल्वासामध्ये जाहीर सभा देखील होणार आहे. सिल्वासा (Silvassa) हे दादरा आणि नगर-हवेली या भारतातील केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे. सभा जरी सिल्वासामध्ये होत असली तरी फायदा एसटी महामंडळाचा (Maharashtra ST Bus) होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी येणाऱ्या लोकांच्या वाहतुकीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाच्या 500 बसेस भाडेतत्वावर घेण्यात आल्या आहेत.
कसा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10.30 वाजता तिरुवनंतपुरम सेंट्रल रेल्वे स्टेशनवर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर सकाळी 11 वाजता ते तिरुअनंतपुरममधील सेंट्रल स्टेडियममध्ये 3200 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील. त्यानंतर दुपारी 4 वाजता नमो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चला पंतप्रधान भेट देणार आहेत. तर साडेचार वाजता ते दादरा आणि नगर हवेली सिल्वासा येथे 4850 कोटी रुपयांच्या राष्ट्र विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. यानंतर सायंकाळी सहा वाजता पंतप्रधान दमणमधील देवका सीफ्रंटचे उद्घाटन करणार आहेत.
केरळमधील वंदे भारत एक्सप्रेस 5 तासात 11 जिल्हे कव्हर करणार
केरळमध्ये आजपासून तिरुअनंतपुरम ते कासारगोड अशी वंदे भारत एक्सप्रेस सुरु होत आहे. ही ट्रेन आज तिरुवनंतपुरम रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे. ही ट्रेन तिरुअनंतपुरम, कोल्लम, कोट्टायम, एर्नाकुलम, त्रिशूर, पलक्कड, पठानमथिट्टा, मलप्पुरम, कोझिकोड, कन्नूर आणि कासारगोड हे 11 जिल्हे कव्हर करणार आहे. तिरुअनंतपुरम ते कासारगोड दरम्यान धावणारी ही ट्रेन 14 रेल्वे स्थानकांवर थांबेल. 25 एप्रिल रोजी पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या (Vande Bharat Express) उद्घाटनाबाबत मी उत्साही असल्याचे पंतप्रधानांनी त्यांच्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे. ही ट्रेन धावल्याने पर्यावरण आणि पर्यटनाला चालना मिळेल, असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :