एक्स्प्लोर

World Malaria Day 2023 : आज जागतिक मलेरिया दिन; वाचा या दिनाचा इतिहास आणि महत्त्व

World Malaria Day 2023 : जागतिक मलेरिया दिन हा दरवर्षी 25 एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.

World Malaria Day 2023 : आज जागतिक मलेरिया दिन (World Malaria Day). मलेरिया हा डासांच्या चावण्यामुळे होणारा रोग आहे. जागतिक स्तरावर दरवर्षी मलेरिया दिन 25 एप्रिल रोजी मलेरिया नियंत्रित करण्यासाठी पाळण्यात येतो. जागतिक आरोग्य असेंब्लीच्या 60 व्या सत्रामध्ये मे 2007 मध्ये हा दिन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. मलेरियाचे गांभीर्य लक्षात घेता 25 एप्रिल हा 'जागतिक मलेरिया दिन' म्हणून ओळखला जातो.

'प्रोटोजुअन प्लाज्‍मोडियम' (Protozoan Plasmodium) नावाच्या कीटाणूच्या मादी एनोफिलीज डासापासून मलेरिया (Malaria) होतो. आजवर या आजाराने जगभरात अनेकांचे बळी घेतले आहेत. जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने या विषाणूचे वर्णन साथीचा आजार असे केले आहे. जागतिक मलेरिया दिन हा मलेरिया प्रतिबंध, नियंत्रण आणि या आजाराचे निर्मूलन या गोष्टींबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने 2008 मध्ये सर्वप्रथम हा दिवस साजरा केला. 

जागतिक मलेरिया दिनाचा इतिहास

जागतिक मलेरिया दिन हा 25 एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो. 2008 मध्ये अफ्रिकेत हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला. मलेरिया या साथीच्या आजाराने आजवर जगभरात अनेकांचा बळी घेतला आहे. त्यामुळे अवघ्या जगाने एकत्र येत मलेरिया आजाराचे संपूर्ण उच्चाटन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जागतिक मलेरिया दिन साजरा केला जातो. 2007 या वर्षाच्या मे महिन्यात भरलेल्या 60 व्या जागतिक आरोग्य परिषदेत हा दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. 

जागतिक मलेरिया दिनाचे महत्त्व

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या आकडेवारीनुसार सन 2000 आणि 2004 या कालावधीत मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. या काळात मृत्यूदर सुमारे 40% घसरला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा 2019 चा अहवाल सांगतो की, सन 2014-2018 या काळात मात्र मलेरियाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जागतिक पातळीवर विशेष यश आले नाही. धक्कादायक बाब म्हणजे, मलेरिया आजाराच्या उच्चाटनासाठी 25 एप्रिल या दिवशी जरी जागतिक मलेरिया दिन साजरा केला जातो. मात्र, खरंतर जगभरात प्रत्येक 2 मिनिटांना एका बाळाचा अथवा लहान मुलाचा मृत्यू केवळ मलेरियाने होतो. ही जागतिक पातळीवरील सरासरी आहे. यासाठीच या दिनाची अधिक जागरूकता करणं गरजेचं आहे.

मलेरिया आजाराची लक्षणं 

डास चावल्यानंतर आठ दिवसाने मलेरियाची लक्षणं सुरू होतात. यामध्ये ताप येणे, थकवा, स्नायू दुखणे, डोकेदुखी, चक्कर येणे ही मलेरियाची लक्षणं आहेत.  यामधील कोणतीही लक्षणं जर तुम्हाला जाणवली तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध घेऊ शकतात. 

महत्त्वाच्या बातम्या :

Important Days in April 2023 : 'एप्रिल फूल डे', 'अक्षय्य तृतीया', 'रमजान ईद'सह एप्रिल महिन्यातील 'हे' आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ghatkoper Hoarding : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, भावेश भिडेसोबतचा फोटो ट्विट
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, भावेश भिडेसोबतचा फोटो ट्विट
Kiran Mane :
"राज ठाकरेंनी मोठी चालबाजी केली"; किरण माने म्हणाले,"थापेबाजी, स्टंटबाजीचा खेळ करू नका"
Nagpur Crime : 'साहेब तुमच्याच मतदारसंघात राहतो, घरच्यांचा मूत्यू झालाय', भाजप आमदाराला भामट्याने गंडवलं
'साहेब तुमच्याच मतदारसंघात राहतो, घरच्यांचा मूत्यू झालाय', भाजप आमदाराला भामट्याने गंडवलं
Premachi Goshta Serial Update : इंद्राचे पुन्हा मुक्तावर दोषारोप; आदित्यमुळे सागर अडकला मोठ्या संकटात!
इंद्राचे पुन्हा मुक्तावर दोषारोप; आदित्यमुळे सागर अडकला मोठ्या संकटात!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hording EXCUSIVE : होर्डिंगसाठी उभारण्यात आलेला पाया कमकुवत, फक्त 3 मीटरचीच पायाभरणीPm Modi Varanasi : वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गंगापूजन ,आज भरणार उमेदवारी अर्जABP Majha Headlines : 10  AM :14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सNanded : नांदेडच्या छापेमारीत 8 किलो सोनं, 14 कोटींची रोकड जप्त : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ghatkoper Hoarding : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, भावेश भिडेसोबतचा फोटो ट्विट
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, भावेश भिडेसोबतचा फोटो ट्विट
Kiran Mane :
"राज ठाकरेंनी मोठी चालबाजी केली"; किरण माने म्हणाले,"थापेबाजी, स्टंटबाजीचा खेळ करू नका"
Nagpur Crime : 'साहेब तुमच्याच मतदारसंघात राहतो, घरच्यांचा मूत्यू झालाय', भाजप आमदाराला भामट्याने गंडवलं
'साहेब तुमच्याच मतदारसंघात राहतो, घरच्यांचा मूत्यू झालाय', भाजप आमदाराला भामट्याने गंडवलं
Premachi Goshta Serial Update : इंद्राचे पुन्हा मुक्तावर दोषारोप; आदित्यमुळे सागर अडकला मोठ्या संकटात!
इंद्राचे पुन्हा मुक्तावर दोषारोप; आदित्यमुळे सागर अडकला मोठ्या संकटात!
मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या मनात भाजपसोबत जाण्याची इच्छा होती , 'माझा व्हिजन'मध्ये सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या मनात भाजपसोबत जाण्याची इच्छा होती , 'माझा व्हिजन'मध्ये सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
Salman Khan House Firing Case : मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरियाणातून उचललं
मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरियाणातून उचललं
कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
Deepika Padukone Ranveer Singh :
"दीपिका पादुकोणला आमची केमिस्ट्री आवडत नाही"; रणवीर सिंहने व्यक्त केली खंत
Embed widget