एक्स्प्लोर

जळगावसह देशातील पाच विमानतळांवर आठ नवीन उड्डाण प्रशिक्षण केंद्रे स्थापन करणार

भारताला एक प्रमुख जागतिक दर्जाचं उड्डाण प्रशिक्षण केंद्र बनविणं आणि प्रशिक्षणासाठी विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर रोख लावणं हे ही आठ प्रशिक्षण केंद्रं स्थापन करण्यामागील मुख्य उद्दीष्ट असल्याचं नागरी उड्डाण मंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. प्रशिक्षण केंद्रासाठी कर्नाटकातील बेळगाव आणि कलबुर्गी विमानतळ, महाराष्ट्रातील जळगाव, मध्य प्रदेशातील खजुराहो आणि आसाममधील लिलबाडी विमानतळांची निवड करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : नागरी उड्डाण मंत्रालयाने बुधवारी सांगितले की, देशाला वैमानिक पायलट प्रशिक्षणाचे केंद्र बनविण्याच्या उद्देशाने पाच विमानतळांवर आठ नवीन विमान उड्डाण प्रशिक्षण अकादमी स्थापन केल्या जातील. मंत्रालयाने सांगितलं की, यासाठी कर्नाटकातील बेळगाव आणि कलबुर्गी विमानतळ, महाराष्ट्रातील जळगाव, मध्य प्रदेशातील खजुराहो आणि आसाममधील लिलबाडी विमानतळांची निवड करण्यात आली आहे. असुरक्षित हवामान आणि नागरी किंवा सैनिकी हवाई वाहतुकीमुळे कमीतकमी व्यत्यय आणणारी परिस्थिती लक्षात घेऊन या विमानतळांची निवड केली गेली आहे.

पुढे बोलताना मंत्रालयाच्या वतीनं माहिती देण्यात आली की, ही आठ प्रशिक्षण केंद्रं स्थापन करण्यामागील उद्दीष्ट म्हणजे, भारताला एक प्रमुख जागतिक दर्जाचं उड्डाण प्रशिक्षण केंद्र बनविणं आणि प्रशिक्षणासाठी विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर रोख लावणं हा आहे. त्यासोबतच या प्रशिक्षण केंद्रांचं डिझाईन भारताच्या शेजारच्या देशांमधील विद्यार्थ्यांच्या विमान प्रशिक्षणासंदर्भातील आवश्यकता लक्षात घेऊन करण्यात येईल असंही मंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात आलं.  

दरम्यान, विमान वाहतूक मंत्रालयांतर्गत असलेल्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ही आठ प्रशिक्षण केंदे स्थापन करण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. मंत्रालयाच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, "31 मे 2021 रोजी अकादमी तयार करण्यासाठी हे पत्र देण्यात आले. ज्यामध्ये आशिया-पॅसिफिक, जेटसर्व, रेडबर्ड, समवर्धने आणि स्काईनेक्स यांसारख्या सर्वाधिक बोली लावणाऱ्या कंपन्यांना हे काम देण्यात आलं." ते म्हणाले की, एएआयने विमान वाहतुकीच्या सुरक्षिततेचे पैलू, नियामक यंत्रणा, विमान चालवण्यासाठी वैमानिकांना प्रशिक्षण देण्याचा अनुभव आणि उपकरणं, तसेच प्रशिक्षकांची उपलब्धता अशा निकषांच्या आधारे या निविदा दाखल करणाऱ्या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे.

नागरी उड्डाण मंत्रालयाने सांगितले की, "उड्डाण प्रशिक्षण केंद्रांच्या कामासाठी बोली लावणाऱ्या कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी एएआयने मासिक भाडे 15 लाखांवर आणले आहे. त्याचसोबत या निविदाधाकारांसाठी व्यवसाय अनुकूल करण्यासाठी विमानतळ रॉयल्टी ही संकल्पना दूर करण्यात आली."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरे, मुंडेंनंतर आता मनोज जरांगेंचाही दसरा मेळावा? 'या' महत्त्वाच्या ठिकाणी करणार शक्तिप्रदर्शन; हालचालींना वेग!
ठाकरे, मुंडेंनंतर आता मनोज जरांगेंचाही दसरा मेळावा? 'या' महत्त्वाच्या ठिकाणी करणार शक्तिप्रदर्शन; हालचालींना वेग!
Rain alert: कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्राच्या इशान्येकडे, आज राज्यात या भागात मुसळधार पावसाचा 'यलो अलर्ट'
कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्राच्या इशान्येकडे, आज राज्यात या भागात मुसळधार पावसाचा 'यलो अलर्ट'
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर स्वसंरक्षणार्थ की जाणूनबुजून केलेला कट? जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टने खळबळ, प्रत्यक्षदर्शीने सांगितलं नेमकं काय घडलं?
अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर स्वसंरक्षणार्थ की जाणूनबुजून केलेला कट? जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टने खळबळ, प्रत्यक्षदर्शीने सांगितलं नेमकं काय घडलं?
Nandurbar News : विधानसभेच्या तोंडावर नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का, मंत्री विजयकुमार गावितांच्या बंधूंचा पक्षाला रामराम
विधानसभेच्या तोंडावर नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का, मंत्री विजयकुमार गावितांच्या बंधूंचा पक्षाला रामराम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut On ladki Bahin Yojna : लाडकी बहिण योजना हा मोठा भ्रष्टाचार, हे स्वत: मोदी म्हणत आहेतMira Road Crime News : दबक्या पावलांनी आले, बुरखा घालून रुगाणालयातून 21 लाख लंपास केलेNandurbar : नंदुरबारमध्ये सरासरी 120 टक्के पाऊस, दीड हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसानPalghar Heavy Rain : पालघरमध्ये परतीच्या पावसाची दमदार हजेरी, भात शेतीचे मोठे नुकसान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरे, मुंडेंनंतर आता मनोज जरांगेंचाही दसरा मेळावा? 'या' महत्त्वाच्या ठिकाणी करणार शक्तिप्रदर्शन; हालचालींना वेग!
ठाकरे, मुंडेंनंतर आता मनोज जरांगेंचाही दसरा मेळावा? 'या' महत्त्वाच्या ठिकाणी करणार शक्तिप्रदर्शन; हालचालींना वेग!
Rain alert: कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्राच्या इशान्येकडे, आज राज्यात या भागात मुसळधार पावसाचा 'यलो अलर्ट'
कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्राच्या इशान्येकडे, आज राज्यात या भागात मुसळधार पावसाचा 'यलो अलर्ट'
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर स्वसंरक्षणार्थ की जाणूनबुजून केलेला कट? जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टने खळबळ, प्रत्यक्षदर्शीने सांगितलं नेमकं काय घडलं?
अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर स्वसंरक्षणार्थ की जाणूनबुजून केलेला कट? जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टने खळबळ, प्रत्यक्षदर्शीने सांगितलं नेमकं काय घडलं?
Nandurbar News : विधानसभेच्या तोंडावर नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का, मंत्री विजयकुमार गावितांच्या बंधूंचा पक्षाला रामराम
विधानसभेच्या तोंडावर नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का, मंत्री विजयकुमार गावितांच्या बंधूंचा पक्षाला रामराम
Sharad Pawar : रोहित पवार राज्याचे पुढचे मुख्यमंत्री? शरद पवारांच्या वक्तव्याने नेत्यांच्या भुवया उंचावल्या, नेमकं काय घडलं?
रोहित पवार राज्याचे पुढचे मुख्यमंत्री? शरद पवारांच्या वक्तव्याने नेत्यांच्या भुवया उंचावल्या, नेमकं काय घडलं?
"हे त्यांच्या कर्माचं फळ, जगाला दोष देऊ नका..."; UN मध्ये परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे पाकिस्तानसाठी खडे बोल
Baramati Crime : संतापजनक! बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर आणखी 7 जणांनी केला होता लैंगिक अत्याचार, धक्कादायक माहिती उघड
संतापजनक! बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर आणखी 7 जणांनी केला होता लैंगिक अत्याचार, धक्कादायक माहिती उघड
PHOTO: ऑक्टोबरचा महिना, मनोरंजनाचा पेटारा, Netflix वर येतायत 21 चित्रपट आणि वेब सीरिज; पाहा संपूर्ण List
ऑक्टोबरचा महिना, मनोरंजनाचा पेटारा, Netflix वर येतायत 21 चित्रपट आणि वेब सीरिज; पाहा संपूर्ण List
Embed widget