Baramati Crime : संतापजनक! बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर आणखी 7 जणांनी केला होता लैंगिक अत्याचार, धक्कादायक माहिती उघड
Baramati Crime : बारामतीतील दोन अल्पवयीन मुलींवर पुण्यातील हडपसर परिसरातील एका खोलीत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या प्रकरणात आणखी ७ जणांची नावे समोर आली आहेत.
बारामती: बारामतीतील दोन अल्पवयीन मुलींना पुण्यातील हडपसर परिसरातील चार जणांनी अत्याचार केला होता त्यानंतर आणखी सात जणांनी अत्याचार केल्याचा प्रकार तपासामध्ये समोर आला आहे. यामधील ज्ञानेश्वर आटोळे, अनिकेत बेंगारे यश उर्फ सोन्या आटोळे अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. बारामती तालुका ग्रामीण पोलिसांनी तपास केल्यानंतर यापूर्वी या दोन मुलींवर बारामतीतीलच सात जणांनी अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी यामधील आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. (Crime News)
14 सप्टेंबर रोजी दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या वेगवेगळ्या फिर्यादी बारामती तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. या दोघी मुली शहरातील वेगवेगळ्या शाळांमध्ये नववीमध्ये शिक्षण घेत आहेत. परंतु त्या एकमेकींच्या मैत्रिणी आहेत. त्या 14 सप्टेंबरला घरात कोणाला काहीही न सांगता पुण्याला निघून गेल्या. बसने त्या पुण्यात पोहोचल्या. जाताना त्यांनी ज्ञानेश्वर आटोळे याच्याशी संपर्क साधला. मुलींपाठोपाठ तो ही बारामतीतून हडपसरला गेला. तेथे एका मित्राच्या खोलीवर या मुलींना नेण्यात आलं. रात्री त्यांना दारु पाजून या तिघांसह अन्य एका आरोपीने त्यांचे आळीपाळीने लैंगिक शोषण केले.
दरम्यान यातील एका मुलीने हडपसरहून तिच्या आईला फोन केला. आईने बारामती तालुका पोलिसांना याची माहिती दिली. त्यानुसार तालुका पोलिसांनी हडपसर पोलिसांशी संपर्क साधला. बारामतीतून महिला पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह एक पथक हडपसरकडे रवाना झाले. 16 तारखेला या मुलींना पोलिसांनी बारामतीत आणले. येथे त्यांचे महिला पोलिसांकडून समुपदेशन केले जात असताना या दोघींनी दारु पाजून चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती दिली.
या दोन्ही मुलींनी पोलिस तपासामध्ये अजून सात जणांची नावे घेतली असून आता या प्रकरणात या सातही जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आता एकूण अकरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी नवीन पुरवणीमध्ये या सात आरोपींत्या नावाचा समोवेश केला आहे. ओंकार भारती, ओम कांबळे, अप्पा शेंडे, अक्षय मडके, सूरज इंदलकर, संस्कार वाघमारे व श्रेणिक भंडारी (संपूर्ण नावे नाहीत) या सात जणांवर बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून या सातही जणांचा पोलिस शोध घेत आहेत.
नेमकं काय घडलं?
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 14 सप्टेंबर रोजी दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या वेगवेगळ्या फिर्यादी बारामती तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या दोघी मुली शहरातील वेगवेगळ्या शाळांमध्ये नववीमध्ये शिक्षण घेत आहेत. परंतु त्या एकमेकींच्या मैत्रिणी आहेत. त्या 14 सप्टेंबरला घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेल्या. बसने त्या पुण्यात पोहोचल्या. जाताना त्यांनी ज्ञानेश्वर आटोळे याच्याशी संपर्क साधला. त्याने हडपसर परिसरातील दोघा मित्रांना या मुली येत असल्याचे सांगितले.
मुलींपाठोपाठ तो ही बारामतीतून हडपसरला गेला. तेथे एका मित्राच्या खोलीवर या मुलींना नेण्यात आले. रात्री त्यांना दारु पाजून या तिघांसह अन्य एका फरार आरोपीने त्यांचे आळीपाळीने लैंगिक शोषण केले. दरम्यान यातील एका मुलीने हडपसरहून तिच्या आईला फोन केला. आईने बारामती तालुका पोलिसांना याची माहिती दिली. त्यानुसार तालुका पोलिसांनी हडपसर पोलिसांशी संपर्क साधला. बारामतीतून महिला पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह एक पथक हडपसरकडे रवाना झाले.16 तारखेला या मुलींना पोलिसांनी बारामतीत आणलं.