एक्स्प्लोर

Nandurbar News : विधानसभेच्या तोंडावर नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का, मंत्री विजयकुमार गावितांच्या बंधूंचा पक्षाला रामराम

Maharashtra Assembly Election 2024 : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. डॉ. विजयकुमार गावित यांच्या बंधूंनी भाजपला रामराम ठोकला आहे.

नंदुरबार : ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) तोंडावरच नंदुरबारमध्ये (Nandurbar News) भाजपला मोठा धक्का बसला आहे. राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांचे बंधू भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित (Rajendrakumar Gavit) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कोणत्याही परिस्थितीत शहादा-तळोदा मतदारसंघातून (Shahada-Taloda Assembly Constituency) निवडणूक लढवणारच, अशी घोषणा भाजप नेते राजेंद्रकुमार गावित (Rajendrakumar Gavit) यांनी केली होती. त्यानंतर आता राजेंद्रकुमार गावित यांनी राजीनामा दिला आहे. 

राजेंद्रकुमार गावित कुठल्या पक्षात जाणार?

राजेंद्रकुमार गावित हे शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता राजेंद्रकुमार गावित नेमकं कुठल्या पक्षात जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राजेंद्रकुमार गावित निवडणूक लढणार असल्यामुळे आमदार राजेश पाडवी यांची डोकेदुखी वाढली आहे. तर निवडणुकीच्या तोंडावर राजेंद्रकुमार गावित यांनी पक्षाच्या राजीनामा दिल्याने भाजपाला मोठं खिंडार पडलं आहे. 

अजितदादांचे शिलेदारही निवडणुकीसाठी इच्छुक

तर शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Group) जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे (Mohan Shewale) यांनीही उमेदवारीसाठी रणशिंग फुंकले आहे. मोहन शेवाळे यांनी तळोदा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेत संवाद यात्रा सुरु केली असून ते संपूर्ण मतदारसंघात मतदार आणि कार्यकर्त्यांसमोर जात आहेत. यावेळी अब की बार स्थानिक आमदार, अशी घोषणा त्यांनी दिली आहे. त्यामुळे महायुतीमधील नाराजीनाट्य समोर आले असून नंदुरबारमधील राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. 

कोण आहेत राजेंद्रकुमार गावित?

राजेंद्रकुमार गावित हे देवमोगरा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष असून राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू आहेत. यापूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी मुलाखत दिली होती. 2014 मध्ये त्यांनी शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. पुढे 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांना निवडणुकीचे तिकीट नाकारण्यात आले. आता आगामी विधानसभेची निवडणूक आपण लढवणारच असं गावित यांनी स्पष्ट करत भाजपचा राजीनामा दिला आहे.

आणखी वाचा

Sharad Pawar : रोहित पवार राज्याचे पुढचे मुख्यमंत्री? शरद पवारांच्या वक्तव्याने नेत्यांच्या भुवया उंचावल्या, नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 12 डिसेंबर 2024 : 07 PM ABP MajhaParbhani Violence : परभणीमधील जाळपोळ - तोडफोडीत छोट्या व्यापाऱ्यांना फटकाPune Gold Datta Idol : पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्तीABP Majha Headlines : 07 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
Embed widget