एक्स्प्लोर
PM किसान योजनेचे 18 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये 'या' शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत, पण कारण काय?
PM Kisan Yojana Next Installment: देशातील 12 कोटींहून अधिक लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. हे शेतकरी योजनेच्या 18 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, या शेतकऱ्यांचा पुढील हप्ता अडकू शकतो.

PM Kisan Yojana
1/8

भारत सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवतं. या योजनांचा थेट लाभ शेतकऱ्यांना होतो.
2/8

आजही भारतात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांची आर्थिक स्थिती फारशी स्थिर नाही. या शेतकऱ्यांना भारत सरकार आर्थिक मदत करते.
3/8

यासाठी भारत सरकारनं 2019 मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक रक्कम दिली जाते.
4/8

सरकार प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवते. आतापर्यंत या योजनेचे 17 हप्ते पाठविण्यात आले आहेत.
5/8

देशातील 12 कोटींहून अधिक लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे आता शेतकरी योजनेच्या 18 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.
6/8

मात्र, काही शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपयांचा हफ्ता येणार नाही.
7/8

ज्यांनी सरकारच्या आदेशानंतरही ई-केवायसी आणि जमीन पडताळणीची प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही, त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान निधीचा अठरावा हफ्ता येणार नाही.
8/8

तुम्हीही या योजनेसाठी पात्र असाल आणि अद्याप ई-केवायसी आणि जमीन पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल, तर त्वरित करून घ्या. नाहीतर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.
Published at : 28 Sep 2024 12:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
महाराष्ट्र
जळगाव
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
