NEET 2021 Application Form : मेडिकलमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! नीट परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया लवकरच...
NEET 2021 Application Form : मेडिकलला अॅडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी NEET ची अधिकृत वेबसाईट आजपासून सक्रीय केली आहे. अद्याप या वेबसाईटवर NEET 2021 संबंधीचे कोणतेही अपडेट नाही.
NEET UG 2021: मेडिकलमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा आता संपली आहे. राष्ट्रीय परीक्षा एजेंसी (NTA) बुधवारपासून नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट(NEET) 2021 च्या संदर्भात तयारीला लागली आहे. नीट 2021 साठी फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेसाठी NTA नं आपली अधिकृत वेबसाईट ntaneet.nic.in अॅक्टिव्ह केली आहे. मेडिकलला अॅडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी NEET ची अधिकृत वेबसाईट आजपासून सक्रीय केली आहे. अद्याप या वेबसाईटवर NEET 2021 संबंधीचे कोणतेही अपडेट नाही. मात्र लवकरच लेटेस्ट अपडेट आणि घोषणा आता NTA च्या या वेबसाईट वर केली जाण्याची शक्यता आहे.
NEET 2021 अॅप्लिकेशन फॉर्मसोबत ऑफिशियल ब्रोशर neet.nta.nic.in 2021 वर लवकरच येण्याची शक्यता आहे. यापूर्वी NTA ने 12 मार्च रोजी नीट 2021 चे नोटिफिकेशन nta.ac.in वर जारी केले होते. या नोटिफिकेशननुसार अंडर ग्रॅज्युएट मेडिकल आणि डेंटल अभ्यासक्रमांसाठी नॅशनल एंट्रन्स टेस्ट कम एलिजिबिलिटी टेस्ट (NEET 2021) 1 ऑगस्ट 221 रोजी आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा 11 भाषांमध्ये आयोजित होणार असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.
मेडिकल कोर्सेसमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे सर्व उमेदवार नीट 2021 परीक्षेसाठी अर्ज करु शकतात. जे उमेदवार NTA NEET वेबसाइट वर रजिस्ट्रेशन करतील त्यांना लॉगिन डिटेल्स दिले जाणार आहे. हे लॉगिन वापरून nta.neet.nic.in वर जाऊन आपल्या अर्ज भरु शकतील. किंवा आपल्या अर्जाबाबतचे अपडेट किंवा अन्य कुठलेही अपडेट जाणून घेऊ शकतात.
कोण भरु शकतं नीट 2021 चा फॉर्म?
बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री हे मुख्य विषय घेऊन 12वी पास झालेले विद्यार्थी नीट परीक्षेसाठी अप्लाय करु शकतात. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांचा बारावीचा निकाल अद्याप आलेला नाही किंवा ओपन स्कूल तथा प्रायव्हेट मधून 12वी (10+2) परीक्षा पास केली आहे, ते विद्यार्थी देखील NEET UG Application Form भरु शकतात. यासाठी विद्यार्थ्याचे वय कमीत कमी 17 वर्ष आणि जास्तीत जास्त 25 वर्ष असावं. आरक्षित वर्गांसाठी वयामध्ये पाच वर्षांची सवलत आहे.
लेटेस्ट अपडेट अधिकृत वेबसाईटवर
सर्व उमेदवारांना सल्ला देण्यात आला आहे की अद्ययावत माहितीसाठी NEET 2021 वेबसाइट चेक करत राहावी. NEET अॅप्लिकेशन फॉर्म, शेड्युल, ब्रोशर, अॅडमिट कार्ड, आन्सर-की, निकाल आणि कट-ऑफ अशा सर्व महत्त्वाच्या घोषणा आणि अपडेट neet.nta.nic.in वरच जाहीर केले जातील.