Coronavirus Cases : गेल्या 24 तासात देशात 2 लाख 68 हजार 833 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 402 जणांचा मृत्यू
गेल्या 24 तासात देशात 2 लाख 68 हजार 833 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ही रुग्णवाढ चिंता वाढवणारी आहे. तर मागील 24 तासात देशात कोरोनामुळे 402 लोकांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus Cases Today in India : देशात दिवसेंदिवस कोरोना (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोनाबरोबरच ओमायक्रॉनचे (Omicron) रुग्ण देखील वाढत आहेत. गेल्या 24 तासात देशात 2 लाख 68 हजार 833 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ही रुग्णवाढ चिंता वाढवणारी आहे. तर मागील 24 तासात देशात कोरोनामुळे 402 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ओमायकॉनच्या रुग्णसंख्येत देखील मोठी वाढ झाली आहे. आत्तापर्यंत ओमायक्रॉनचे 6 हजार 41 रुग्ण आढळून आले आहेत.
India's Covid case tally rises by 2,68,833 to reach 3,68,50,962; death toll reaches 4,85,752 with 402 more fatalities: Health Ministry
— Press Trust of India (@PTI_News) January 15, 2022
सध्या देशात कोरोनाचा पॉझिटीव्हीटी रेट हा 16.66 टक्के आहे. जो काल 14.78 टक्के होता. म्हणजे दैनंदीन पॉझिटीव्हीटी रेटमध्ये देखील मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. काल देशात कोरोनाच्या 2 लाख 64 हजार 202 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. आज त्यामध्ये 4 हजार 631 रुग्णांची भर पडली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या ही 14 लाख 17 हजार 820 झाली आहे. तर कोरोनामुळे आत्तापर्यंत 4 लाख 85 हजार 752 लोकांनी आपला जीव गमावला आहे. काल दिवसबरात 1 लाख 22 हजार 622 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. तर देशात आत्तापर्यंत 3 कोटी 49 लाख 47 हजार 390 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. काल देशात सक्रिय रुग्णांची संख्या ही 12 लाख 72 हजार 73 एवढी होती. आज त्यामध्ये वाढ झाली आहे.
सध्या देशात लसीकरण देखील वेगाने सुरू आहे. ज्या लोकांनी अद्याप लस घेतली नाही त्यांनी लस घेण्याचे आवाहन केंद्र सरकारकडून वेळोवेळी करण्यात येत आहे. आत्तापर्यंत देशात 156 कोटींहून अधिक लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात देशात 58 लाख 2 हजार 976 लसींचे डोस देण्यात आले आहेत. तर आत्तापर्यंत एकूण 156 कोटी 2 लाख 51 हजार 117 लसींचे डोस देण्यात आले आहेत.