एक्स्प्लोर
पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी कबड्डीपटू रोहित चिल्लरला अटक
मुंबई : भारताचा स्टार कबड्डीपटू रोहित चिल्लरला पत्नी ललिताच्या आत्महत्येप्रकरणी बेड्या पडल्या आहेत. दिल्ली पोलिसांच्या पथकाने मुंबईत चिल्लरला अटक केली. रोहितचे वडील विजय यांनीही पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे.
रोहितने आपण पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी निर्दोष असल्याचा दावा केला आहे. आपण तिचा हुंड्यासाठी कधीच छळ केला नाही, आपल्यावर लागलेले सर्व आरोप चुकीचे आहेत, असं रोहितने म्हटलं आहे.
रोहितच्या पत्नीने आत्महत्येपूर्वी ऑडिओ क्लीप आणि सुसाईड नोटच्या माध्यमातून रोहित आणि त्याच्या आई-वडिलांवर गंभीर आरोप केले होते. याआधारे पोलिसांनी पती रोहित चिल्लर आणि त्याच्या आईवडिलांविरोधात एफआयआर नोंदवला होता.
पत्नीच्या आत्महत्येनंतर रोहित चिल्लर परागंदा झाला होता. तो आता समोर आला असून त्याने फेसबुक पोस्टच्या माध्यमातूनही आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. 'माझं ललितावर मनापासून प्रेम होतं. मी तिच्याशी प्रतारणा केली नाही. मी तिला कधीच त्रास दिला नाही.' असं त्याने म्हटलं आहे.
स्टार कबड्डीपटू रोहित चिल्लरच्या पत्नीची आत्महत्या
रोहित चिल्लर 16 मार्च 2016 रोजी विवाहबंधनात अडकला होता. चार वर्षांची मैत्री आणि प्रेमप्रकरणानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. ललिताच्या माहेरच्या मंडळींच्या आरोपांनुसार रोहित लग्न झाल्यापासून तिचा हुंडयासाठी छळ करायचा. छळामुळे ती त्रासलेली होती आणि याच नैराश्यातून तिने टोकाचं पाऊल उचललं. ललिताने दिल्लीतल्या नांगलोईमध्ये पित्याच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सोमवारी 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 7.30च्या सुमारास तिच्या वडिलांनी ललिताचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. रोहित चिल्लर प्रो कब्बडी लीगच्या चौथ्या सीजनमध्ये बंगळुरु बुल्स आणि तिसऱ्या सीजनमध्ये पटना पायरेट्स संघात होता. ललितानं जेव्हा आत्महत्या केली त्यावेळी रोहित मुंबईत होता. पाहा फेसबुक पोस्ट :अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement