एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक, एक पोलीस शहीद
नवी दिल्ली : जम्मू-काश्मिरच्या पुलवामा भागातील त्राल परिसरात हिजबुल मुजाहिदीनचे तीन ते चार दहशतवादी लपल्याचं वृत्त असून, दहशतवादी आणि सैन्य दलाची चकमक सुरु आहे. सध्या या चकमकीत एक पोलीस कर्मचारी शहीद झाला आहे. तर सीआरपीएफचा एक, आणि सैन्य दलाचे इतर दोन जवान जखमी झाले आहेत. पण दहशतवाद्यांचा खात्म करण्यासाठी आलेल्या सैन्य दलावरच यावेळी काही स्थानिकांनी दगडफेक केली.
सैन्याच्या जवानांनी दहशतवाद्यांचा शोध घेऊन, त्यांना कंठस्नान घालण्यासाठी शोध मोहिम सुरु केली. पण त्याचवेळी काही स्थानिकांनी त्यांच्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. या चकमकीदरम्यान पोलीस कर्मचारी मंजूर अहमद शहीद झाले आहेत. तर सीआरपीएफचा एक आणि सैन्य दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत. तर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सैन्याच्या जवानांना यश आलं आहे.
यापूर्वीही दहशतवाद्यांचा खात्मा करायला आलेल्या सैन्य दलावर काही स्थानिकांनी दगडफेक केली होती. यावर सेना प्रमुखांनी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना इशाराही दिला होता. गेल्या महिन्यात हंदवाडामध्ये झालेल्या चकमकीत सेना प्रमुखांनी इशारा देताना, जर त्यांनी दहशतवाद्यांना मदत करणे बंद केले नाही, तर त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता. तसेच यावेळी प्रदर्शन करणाऱ्यांना गोळ्याही खाव्या लागू शकतील असं सांगितलं होतं.
हंदवाडामधल्या चकमकीवेळी सैन्य दलाचे चार जवान शहीद झाले होते. यावेळी दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी काही स्थानिकांनी सैन्य दलावर दगडफेक केली होती. अन् त्याचा आडपडदा घेऊनच दहशतवाद्यांनी सैन्य दलाला लक्ष्य केलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
सोलापूर
Advertisement