Amarnath Yatra : अमरनाथ यात्रेला पुन्हा सुरुवात, ढगफुटीमुळे स्थगित करण्यात आली होती यात्रा
Amarnath Yatra 2022 : ढगफुटीमुळे स्थगित करण्यात आलेली अमरनाथ यात्रा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. बेस कँम्पवरून यात्रेकरु यात्रेसाठी रवाना झाले आहेत.
Amarnath Yatra 2022 : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) अमरनाथ गुहेजवळ (Amarnath Cloudburst) ढगफुटी होऊन मोठी दुर्घटना घडली. त्यामुळे अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली होती. आता यात्रा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. जम्मूमधील बेस कँम्पमधून (Base Camp) यात्रेकरुंचा पहिला गट अमरनाथच्या गुहेकडे जाण्यासाठी रवाना झाला आहे. यात्रा पुन्हा सुरु झाल्याने यात्रेकरुंमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
अमरनाथ गुहेजवळ 08 जुलै रोजी ढगफुटी होऊन पूर आला होता. या दुर्घटनेत 16 रुग्णांचा मृत्यू झाला असून अद्यापही सुमारे 40 जण बेपत्ता आहेत. तर जखमी लोकांना एअरलिफ्ट करत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमींवर उपचार सुरु आहेत. अचानक ढगफुटी होऊन पूर आल्याने अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे यात्रेकरु अमरनाथ यात्रा पुन्हा सुरु होण्याची वाट पाहत होते.
J&K | Amarnath yatra which was partially suspended due to cloudburst has resumed. After being halted in Jammu, the fresh batch of #Amarnath pilgrims have started to move from the Jammu base camp pic.twitter.com/OkDCh8Vpwc
— ANI (@ANI) July 10, 2022
दोन वर्षानंतर अमरनाथ यात्रा होत आहे. कोरोनामुळे दोन वर्ष अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली होती. आता स्थगित यात्रा पुन्हा सुरु झाल्याने यात्रेकरुंमध्ये आनंदाचं वातावरण आहे. यात्रेकरुंनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, 'आम्ही बाबा बर्फानी यांचा आर्शिवाद घेण्याचं ठरवून आलो आहे. त्यामुळे भगवान शंकराचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही घरी परतणार नाही. यात्रेवेळी अचानक दुर्घटना घडली. मात्र यात्रा पुन्हा सुरु झाल्याने आम्ही आनंदी आहोत.'
"We are filled with energy and will not go back without darshan of Baba. We have full faith in Baba Bhole and are waiting for the darshans of Baba. We are happy that the yatra has resumed. CRPF and other personnel have guided us to move ahead safely," said the pilgrims pic.twitter.com/snekaI6JXB
— ANI (@ANI) July 10, 2022
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Amarnath Yatra : अमरनाथजवळ सांगलीतील 47 जणांचा ग्रुप अडकला, यात्रा आजही स्थगित; रेस्क्यू ऑपरेशन सुरु
- Amarnath Cloudburst : अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी, 15 लोकांचा मृत्यू, रेस्क्यू ऑपरेशन सुरु
- Amarnath Yatra : अमरनाथ गुहेजवळ मोठी दुर्घटना, अंगाचा थरकाप उडवणारे व्हिडीओ समोर