एक्स्प्लोर

Amarnath Yatra : अमरनाथजवळ सांगलीतील 47 जणांचा ग्रुप अडकला, यात्रा आजही स्थगित; रेस्क्यू ऑपरेशन सुरु

Amarnath Yatra : अमरनाथजवळ सांगलीतील 47 जणांचा ग्रुप अडकला, जीव वाचले मात्र साहित्य गहाळ, यात्रा आजही स्थगित.

Amarnath Yatra : अमरनाथ गुहेजवळ (Amarnath Cave) झालेल्या ढगफुटीमुळे आतापर्यंत तब्बल 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 65 लोक वाचवण्यात यश आलं असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. अद्याप 41 जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे. बचावकार्य सुरु असून खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. आज तिसऱ्या दिवशीही बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, आज देखील हवामान खराब असल्यानं अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. 

शुक्रवारी संध्याकाळी अमरनाथमध्ये ढगफुटी झाल्यामुळे पूर आला. यात्रेसाठी गेलेले असंख्य लोक अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी प्रशासनाकडून बचावकार्य सुरु आहे. मृतांची संख्या वाढून 16 वर पोहोचली आहे. ज्यामध्ये 7 पुरुष आणि 6 महिलांचा समावेश आहे. तर आणखी 2 मृतदेहांची ओळख पटलेली नाही. या घटनेत जवळपास 65 जण जखमी झाले आहेत. त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 

सांगलीतील 47 जणांचा ग्रुप अमरनाथजवळ अडकला 

अमरनाथ यात्रेसाठी सांगली जिल्ह्यातील 47 जणांचा ग्रुप गेला होता. अमरनाथ गुहेखाली असलेल्या तंबुमध्ये ते मुक्कामास होते. हा ग्रुप दर्शनासाठी गेला आणि अचानक ढगफुटी होऊन त्यांचे तबु गाडले गेले. दैव बलवत्त म्हणून ते बचावले मात्र त्यांचं सगळं साहित्य गाडलं गेलं. काही मिनिटांसाठी ते तंबुच्या बाहेर गेल्यानं त्यांचा जीव वाचला. त्या दुर्घटनेनंतर अजुनही ते धक्क्यात आहेत. आर्मीनं त्यांचे फोन आणि काही साहित्य शोधुन काढलं आहे. मात्र आजही हवामान खराब असल्यानं त्यांचं साहित्य वरती अडकलंय आणि हे लोक बेस कॅम्पला आले आहेत. आज देखील हवामान खराब असल्यानं अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. 

दरम्यान, घटनास्थळी एनडीआरएफचे (NDRF), एसडीआरएफ (SDRF) आणि बचाव पथकाच्या तुकड्या तैनात असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये अचानक झालेल्या ढगफुटीमुळे पूर आला आणि पुराच्या तडाख्यात अनेक तंबू वाहून गेले. या दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली होती. यंदा  30 जूनपासून ही यात्रा सुरू झाली होती. 43 दिवस चालणाऱ्या या यात्रेची 11 ऑगस्ट रोजी सांगता होणार होती. पण सध्या खराब हवामानामुळे ही यात्रा स्थगित करण्यात आली आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bihar : बिहारमधील नितीश-लालू पर्व अखेर संपृष्ठात, नितीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर नवीन नेतृत्व उदयास
बिहारमधील नितीश-लालू पर्व अखेर संपृष्ठात, नितीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर नवीन नेतृत्व उदयास
US Iran War : इराणसोबत चर्चा निष्फळ ठरल्यानंतर ट्रम्प यांनी मोदींना फोन फिरवला, 40 मिनिटे चर्चा, मेगा प्लॅन सांगितला
इराणसोबत चर्चा निष्फळ ठरल्यानंतर ट्रम्प यांनी मोदींना फोन फिरवला, 40 मिनिटे चर्चा, मेगा प्लॅन सांगितला
Salary Increment : दोन वर्षे काम करून फक्त 9 रुपयांची पगारवाढ; नोकरी सोडली तर 1.5 लाख दंड, सॉफ्टवेअर इंजिनिअरची व्यथा
दोन वर्षे काम करून फक्त 9 रुपयांची पगारवाढ; नोकरी सोडली तर 1.5 लाख दंड, सॉफ्टवेअर इंजिनिअरची व्यथा
Loksabha : लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर
लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर

व्हिडीओ

Praful Hinge IPL : कोण आहे पहिलाच सामना गाजवणारा प्रफुल हिंगे? Special Report
Nagpur Shampoo Drugs : शाम्पूची बाटली, कोकेनचा फेस, तस्करीचा पर्दाफाश Special Report
Amravati Scandal : आरोपी अयान अहमदकडून किती जणींचं शोषण? भाजप आक्रमक Special Report
Ashok Kharat : भक्तांचे पॅनकार्ड, अफरातफरीचा रेकॉर्ड, प्रणिती शिंदेंचा काय म्हणाल्या? Special Report
Sanjay Raut On Anjali Damania : दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयाची मदत, चांगला काम करत आहे, राऊतांचा निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CSK Vs KKR : कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
Donald Trump : अमेरिका इराण यांच्यातील तणाव कमी होणार? इराणसोबत दोन दिवसात चर्चा शक्य, डोनाल्ड ट्रम्प यांनी ठिकाण सांगितलं
अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा दोन दिवसात शक्य, डोनाल्ड ट्रम्प यांनी ठिकाण सांगितलं
Gold Rate : सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
Vaibhav Sooryavanshi : आयपीएलमध्ये दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
Praful Hinge: प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
Gautam Gambhir : गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
Embed widget