Amarnath Cloudburst : अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी, 15 लोकांचा मृत्यू, रेस्क्यू ऑपरेशन सुरु
Amarnath Cloudburst : अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 40 जण बेपत्ता आहेत.
Amarnath Yatra Cloudburst : अमरनाथ यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाली आहे. एनडीआरएफचे (NDRF) महासंचालक (DG) अतुल करवाल यांनी माहिती देताना सांगितलं आहे की, या दुर्घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही अनेक जण बेपत्ता आहेत. NDRF पथकाकडून बेपत्ता यात्रेकरुंचा शोध सुरु आहे. सुमारे 40 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे.
घटनास्थळी एनडीआरएफचे (NDRF), एसडीआरएफ (SDRF) आणि बचाव पथकाच्या तुकड्या तैनात असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये अचानक झालेल्या ढगफुटीमुळे पूर आला आणि पुराच्या तडाख्यात अनेक तंबू वाहून गेले. या दुर्घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
ITBP troops conduct rescue operation at lower Amarnath Cave site
— ANI Digital (@ani_digital) July 9, 2022
Read @ANI Story | https://t.co/WgKNSMKJ6S#ITBP #Amarnath #AmarnathCloudburst pic.twitter.com/zeFjLzfzp2
आयटीबीपी पीआरओ (ITBP PRO) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. परिसरात पाऊस सुरुच आहे. वाढलेला धोका पाहता तूर्तास अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. हवामान आणि परिस्थिती सामान्य राहिल्यास यात्रा पुन्हा सुरु करण्यात येईल. जखमी लोकांना उपचारासाठी एअरलिफ्ट केलं जातं आहे.
#WATCH | J&K: Massive amount of water flowing turbulently after a cloud burst occurred in the lower reaches of Amarnath cave. Rescue operation is underway at the site pic.twitter.com/w97pPU0c6k
— ANI (@ANI) July 8, 2022
महत्वाच्या इतर बातम्या
- Amarnath Yatra : अमरनाथ गुहेजवळ मोठी दुर्घटना, अंगाचा थरकाप उडवणारे व्हिडीओ समोर
- Amarnath Yatra : अमरनाथमध्ये मोठी दुर्घटना, ढगफुटीमुळे लंगर आणि तंबू गेले वाहून, 10 जणांचा मृत्यू