(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Indian Railway | रेल्वे मंत्रालयाचे निवेदन, 31 मार्चपासून गाड्या रद्द होणार या निव्वळ अफवा असल्याचं स्पष्टीकरण
सोशल मीडियामध्ये 31 मार्चपासून रेल्वेच्या गाड्या रद्द होणार असल्याची बातमी ही केवळ अफवा असल्याचं भारतीय रेल्वेने (Indian Railway) सांगितलं आहे. या संबंधी जो व्हिडीओ प्रसारित करण्यात येतोय तो जुना असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.
नवी दिल्ली : येत्या 31 मार्चपासून रेल्वेच्या सर्व गाड्या रद्द होणार असल्याच्या सोशल मीडियातील बातम्या या केवळ अफवा असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेऊ नये असे भारतीय रेल्वेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. या संबंधी सोशल मीडियामध्ये काही बातम्या व्हायरल होत आहेत. 31 मार्चपासून गाड्या रद्द करण्यासंबंधीचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय, तो गेल्या वर्षीचा असल्याचंही रेल्वेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
नागरिकांनी या अफवांवर विश्वास ठेऊ नये असंही रेल्वेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. रेल्वेच्या एक्सप्रेस गाड्या आता देशभरात सुरु असून यामधून प्रवास करताना नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करणं आवश्यक आहे असंही रेल्वेना नागरिकांना आवाहन केलं आहे. जर नागरिकांना तिकीट रद्द करायचं असेल तर त्यांना आपले सर्व पैसे परत मिळतील असंही रेल्वेने स्पष्ट केलं आहे.
एक खबर में दावा किया जा रहा है कि 31 मार्च तक सभी ट्रेनें रद्द कर दी गई हैं। #PIBFactCheck: यह खबर पुरानी है। @RailMinIndia ने 31 मार्च, 2021 तक ट्रेन रद्द करने का यह फैसला नहीं लिया है। इस पुरानी खबर को गलत संदर्भ में साझा किया जा रहा है। pic.twitter.com/YcZ8Za9Vj1
— PIB Fact Check (@PIBFactCheck) March 15, 2021
भारतीय जनता पक्षाचे खासदार राम कृपाल यादव यांनी सांगितलं की भारतीय रेल्वेने कोरोना काळात देशातील नागरिकांची मोठी सेवा केली आहे. कया काळात 43 लाख स्थलांतरित मजूरांना आपल्या घरी पोहचवल्याचंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :