केरळमध्ये प्रवासी ट्रेनमध्ये स्फोटकांचा साठा सापडल्याने खळबळ; एका महिलेला अटक
केरळच्या कोझिकोड रेल्वे स्थानकावर चेन्नई-मंगलपुरम या सुपरफास्ट ट्रेनमधून जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी चौकशीसाठी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
केरळ : केरळमध्ये आज सकाळी प्रवासी ट्रेनमध्ये स्फोटकांचा साठा सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रेल्वे प्रोटेक्शन टास्क फोर्सने जिलेटनच्या 100 पेक्षा जास्त कांड्या जप्त केल्या आहे. ही स्फोटक केरळच्या कोझिकोड रेल्वे स्थानकावर चेन्नई-मंगलपुरम या सुपरफास्ट ट्रेनमधून जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी चौकशीसाठी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
रेल्वेच्या ज्या सीटखाली ही स्फोटक मिळाली, तिथे एक महिला बसली होती. ही महिला चेन्नई ते थालास्सेरी असा प्रवास करत होती. महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या महिलेने स्फोटक आणली का? याचा तपास पोलिस करत आहे.
काय आहे जिलेटिन?
जिलेटिन हा विस्फोटक असून ते लिक्विड फॉर्ममध्ये असते. जिलेटिन गन काटन फॅमिलीचे विस्फोटक आहे. भारतात हे विस्फोटक डोंगर फोडण्यासाठी किंवा खाणकामामध्ये वापरण्यात येते. भारतात याच्या वापरासाठी परवान्याची गरज आहे. परंतु याचा वापरासाठी सरकारने नियमावली केली आहे. जिलेटिनचा वापर नक्षली संघटनेबरोबरच आतंकवादी संघटना देखील करतात. भूसुरुंग घडवून आणण्यासाठी एका डब्यात जिलेटिनच्या कांड्या,युरिया, रॉकेल, खिळे, चर्रे, फटाके, दारुगोळा ठेवला जातो. 25 जिलेटिन कांड्यामध्ये 100 मीटरपर्यंत स्फोट घडवून आणण्याची क्षमता आहे.
भारतातील श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनचा साठा सापडला आहे. जिलेटिनच्या 25 कांड्या सापडल्या असून याप्रकरणी नागपूर कनेक्शन समोर आलं आहे. स्कॉर्पिओ गाडीत जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. या कांड्यावर नागपूरच्या कंपनीचं नाव आहे.
संबंधित बातम्या :
Mukesh Ambani | मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली!