एक्स्प्लोर

15th August In History: दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून भारत स्वातंत्र्य झाला, पोस्टाची पीन कोड सेवा सुरू; आज इतिहासात

15th August Important Events : इतिहासात आजच्याच दिवशी पोस्ट खात्याचा पोस्टल इंडेक्स नंबर म्हणजेच पिन कोड लागू झाला. 

15th August In History: इंग्रजांच्या प्रदीर्घ गुलामगिरीनंतर अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताने मोकळा श्वास घेतला आणि भारताच्या भूमीत स्वातंत्र्याचा सूर्य उगवला. ब्रिटिशांनी सत्ता भारतीयांच्या हाती सोपवली आणि त्यांनी देश सोडला. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित नेहरूंनी शपथ घेतली. स्वातंत्र्याच्या आनंदासोबतच फाळणीनंतर मिळालेल्या दंगली आणि जातीय हिंसाचाराच्या वेदनाही होत्या. पण यातून मार्ग काढत भारताने आतापर्यंत वाटचाल केली. या दिवसाशी संबंधित इतर घटनांबद्दल बोलायचे झाल्यास, 15 ऑगस्ट ही तारीख एका खास कारणासाठी भारतीय पोस्टल सेवेच्या इतिहासात नोंदवली जाते. खरे तर 1972 मध्ये 15 ऑगस्ट याच दिवशी 'पोस्टल इंडेक्स नंबर' म्हणजेच पिन कोड लागू झाला. प्रत्येक क्षेत्रासाठी स्वतंत्र पिन कोड असल्याने टपाल वाहतूक करणे सोपे झाले. याशिवाय, 15 ऑगस्ट 2021 रोजी अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघार घेतल्यानंतर तालिबानी सैनिकांनी राजधानी काबूलवर ताबा मिळवला आणि यासह संपूर्ण देश तालिबानच्या ताब्यात गेला. यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी अफगाणिस्तान सोडले.

देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 15 ऑगस्ट या तारखेला नोंदवलेल्या इतर महत्त्वाच्या घटनांचा तपशील पुढीलप्रमाणे, 

1854: ईस्ट इंडिया रेल्वेने कलकत्ता (आता कोलकाता) ते हुगळी पर्यंत पहिली पॅसेंजर ट्रेन चालवली, ही सेवा 1855 मध्ये अधिकृतपणे सुरू झाली.

1866: लिकटेंस्टाईन जर्मन राजवटीतून मुक्त झाला.

1886: भारताचे महान संत आणि विचारवंत गुरु रामकृष्ण परमहंस उर्फ ​​गदाधर चॅटर्जी यांचे निधन झाले.

1945: दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया दोन्ही स्वतंत्र झाले.

1947: भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले.

1947: संरक्षण शौर्य पुरस्कारांची स्थापना - परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र.

1975: बांगलादेशात लष्करी क्रांती.

1950: भारतात 8.6 तीव्रतेच्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी.

1960: काँगो फ्रान्सच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.

1971: बहरीन ब्रिटीश राजवटीपासून स्वतंत्र झाले.

1972: पोस्टल इंडेक्स क्रमांक म्हणजेच पिन कोड लागू करण्यात आला.

1982: देशभर रंगीत प्रसारण आणि टीव्हीचे राष्ट्रीय कार्यक्रम सुरू झाले.

1990: आकाशातून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण.

2007: दक्षिण अमेरिकन देश पेरूच्या मध्य किनारी प्रदेशात 8.0 तीव्रतेच्या भूकंपात 500 हून अधिक लोक मरण पावले.

2021: तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला. राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी देश सोडून गेले.

2021: हैतीमध्ये भूकंपामुळे 724 लोक मरण पावले.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget