Indian Army | भारताकडे जगातले चौथे मजबूत लष्कर, मिलिटरी डायरेक्टच्या अहवालातून स्पष्ट
चीनकडे (China) जगातले सर्वात मजबुत लष्कर असून त्याने अमेरिकेलाही (USA) मागे टाकलं असल्याचं मिलिटरी डायरेक्टच्या अहवालात म्हटलं आहे. तर भारताचा (Indian Army) चौथा क्रमांक लागतोय.
नवी दिल्ली : चीनकडे जगातले सर्वात मजबूत लष्कर असून भारताचा या यादीत चौथा क्रमांक लागतोय असं डिफेन्स वेबसाइट असलेल्या मिलिटरी डायरेक्टच्या नव्या अहवालात सांगण्यात आलं आहे. भारताने 100 पैकी 61 गुण मिळवले आहेत.
चीनने या 100 पैकी 82 गुण मिळवत या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. अमेरिका आपल्या लष्करावर जगात सर्वाधिक खर्च करते. असं असलं तरी अमेरिका या यादीत 74 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. रशिया 69 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर, भारत 61 गुणांसह चौथ्या क्रमांकावर तर फ्रान्स 58 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. ब्रिटनने या यादीत पहिल्या दहा देशांमध्ये कसेबसे स्थान टिकवले असून 43 गुणांसह तो नवव्या क्रमांकावर आहे.
हा अहवाल तयार करण्यासाठी वेगवेगळ्या कसोट्या लावण्यात आल्या आहेत. त्यामध्ये लष्करावर करण्यात येणारा खर्च, लष्करी सैन्याची संख्या, लष्कर, वायूदल आणि नेव्ही मध्ये असणारे एकूण क्षेपनास्त्रे, सरासरी पगार, लष्करी वेपन्स आणि त्याचे वजन अशा अनेक कसोट्यांच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या कसोट्यांच्या आधारे चीनकडे जगातील सर्वात मजबूत लष्कर असल्याचं स्पष्ट झालंय.
अमेरिकेकडून सर्वात जास्त म्हणजे 732 अब्ज डॉलर इतका खर्च लष्करावर करण्यात येतोय. त्यानंतर चीनचा लष्करावरील खर्च हा 261 अब्ज डॉलर इतका आहे तर भारताचा खर्च हा 71 अब्ज डॉलर इतका आहे. चीनची नेव्ही सर्वात बळकट आहे तर अमेरिकेचे वायूदल आणि रशियाचे लष्करही बळकट आहे असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
गेल्या काही वर्षात भारताचा लष्करावरील होणाऱ्या खर्चात वाढ झाल्याचं दिसून येतंय. एकीकडे पाकिस्तानचा धोका तर दुसरीकडे चीनच्या कुरापती यामुळे भारतीय लष्कराला अत्याधुनिक सुविधांनी सजग ठेवण्यासाठी मोठा खर्च करण्यात येतोय.
संबंधित बातम्या :