USA | पत्रकार जमाल खाशोगींचा मारेकरी सौदी अरबचा राजपूत्रच, अमेरिकेच्या अहवालात स्पष्ट
अमेरिकेने वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येचा (Jamal Khashoggi assassination) इंटेलिजेन्स रिपोर्ट (US report) डिक्लासिफाइड केला आहे. त्यामध्ये अमेरिकेने सौदी अरबचा राजपूत्र मोहम्मद बिन सलमानला (Saudi Crown Prince Mohammed bin Salman) पत्रकार खाशोगीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवलं आहे.
![USA | पत्रकार जमाल खाशोगींचा मारेकरी सौदी अरबचा राजपूत्रच, अमेरिकेच्या अहवालात स्पष्ट Saudi Crown Prince Mohammed bin Salman approved Jamal Khashoggi assassination US report USA | पत्रकार जमाल खाशोगींचा मारेकरी सौदी अरबचा राजपूत्रच, अमेरिकेच्या अहवालात स्पष्ट](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/27143413/WhatsApp-Image-2021-02-27-at-8.29.47-AM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
वॉशिंग्टन: वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येप्रकरणी अमेरिकेने सौदी अरबचा क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमानला दोषी ठरवलं आहे. या प्रकरणाचा इंटेलिजन्सचा एक अहवाल अमेरिकेने डिक्लासिफाइड केला असून त्यात सांगितलंय की इस्तंबुलमध्ये खाशोगींची हत्या करण्यात आली होती ती मोहम्मद बिन सलमान यांच्या आदेशावरुनच करण्यात आली होती.
जो बायडेन प्रशासनाने इंटेलिजेन्स रिपोर्ट डिक्लासिफाइड करुन मोठं पाऊल उचलल्याचं सांगण्यात येतंय. जो बायडेन प्रशासनाच्या या निर्णयामुळे मध्य-पूर्व आशियामध्ये खळबळ उडण्याची शक्यता आहे. हा अहवाल ट्रम्प यांच्या कार्यकालात आला होता. पण ट्रम्प यांचे राजपूत्र मोहम्मद बिन सलमान यांच्याशी संबंध लक्षात घेता तो जाहीर केला नव्हता. या अहवालामुळे आता अमेरिका आणि सौदी अरब या दोन देशांदरम्यानच्या संबंधात आता तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
US Airstrike | अमेरिकेचा सीरियावर एअर स्ट्राइक, इराण पुरस्कृत दहशतवादी तळांना निशाणा
अमेरिकन नागरिक असलेल्या पत्रकार जमाल खागोशी यांच्या हत्येनंतर ती हत्या राजपूत्र मोहम्मद बिन सलमान यांनी केल्याचं सांगण्यात येत होतं. पण ट्रम्प यांच्याकडून या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले असा आरोप होत आहे.
तुर्कीमध्ये खाशोगींची हत्या वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्रात जमाल खाशोगी हे सौदी अरबवर एक कॉलम लिहायचे. आपल्या लेखनातून त्यांनी सौदी अरबच्या राज्यकर्ते आणि राजपूत्र मोहम्मद बिन सलमान यांच्यावर टिका करायचे. खाशोगी हे जेव्हा इस्तंबुलमधील सौदी अरबच्या कॉन्सुलेटमध्ये गेले असताना त्यांना एक नशीला पदार्थ देऊन त्यांची हत्या करण्यात आली होती. ही घटना 2018 साली घडली होती. खाशोगी यांच्या हत्येचा थेट संशय सौदी अरबचा राजपूत्र मोहम्मद बिन सलमान यांच्यावर व्यक्त करण्यात येत होता.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)