CREDAI | देशातल्या 2.5 कोटी बांधकाम कर्मचाऱ्यांना मोफत लस देणार, CREDAI चा निर्णय
कृषी क्षेत्रानंतर बांधकाम क्षेत्र (construction workers) हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे रोजगार देणारे क्षेत्र आहे. आता CREDAI ने देशातल्या 2.5 कोटी बांधकाम कर्मचाऱ्यांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतलाय.
नवी दिल्ली : रिअल इस्टेट डेव्हलपर्सची संघटना असलेल्या CREDAI ने आता देशातल्या 2.5 कोटी बांधकाम कर्मचाऱ्यांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. कन्स्ट्रक्शन सेक्टर अर्थात बांधकाम क्षेत्र हे देशातले कृषी क्षेत्रानंतर सर्वाधिक रोजगार देणारे दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र आहे. त्यामुळे CREDAI चा हा निर्णय महत्वाचा मानला जातोय.
CREDAI ( Confederation of Real Estate Developers’ Association of India) ही देशातल्या 21 राज्यांतील 1300 पेक्षा जास्त रिअल इस्टेट डेव्हलपर्सची संघटना आहे. त्याच्या अध्यक्षपदी नुकतेच हर्षवर्धन पटोडिया यांची निवड झाली आहे. अध्यक्षपदावर निवड होताच हर्षवर्धन पटोडिया यांनी मंगळवारी CREDAI कडून देशातल्या 2.5 कोटी बांधकाम कर्मचाऱ्यांना मोफत लस देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
या घोषणेच्या माध्यमातून CREDAI कडून देशात केंद्र सरकारने सुरु केलेल्या लसीकरणाच्या मोहिमेला जलदता देणे आणि देशातल्या गरजू लोकांना कोरोनाची लस देऊन कोरोनावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नाला हातभार लावण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.
देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने 16 जानेवारीला सुरू केलेल्या कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी केवळ 60 वर्षावरील नागरिक आणि गंभीर आजार असलेल्या 45 वर्षावरील नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता 1 एप्रिलपासून 45 वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, 45 वर्षांवरील लोकांना लसीकरण नोंदणी करण्यासाठी को-विन पोर्टलमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. तर 1 जानेवारी 1977 नंतर जन्माला आलेली लोकं यात नोंदणी करू शकतात.
महत्वाच्या बातम्या :
- Gold Silver Price | सोन्याच्या भावात 640 रुपयांची वाढ तर चांदी 1800 रुपयांनी घसरली
- WB Election 2021 | "देशद्रोह्यांना योग्य उत्तर देईल", नंदीग्राममधील प्रचारसभेत ममता बॅनर्जी यांचा शुभेन्दु अधिकारी यांच्यावर निशाणा
- Indian Railway | रात्रीच्या वेळी रेल्वेत मोबाईल, लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय