WB Election 2021 | "देशद्रोह्यांना योग्य उत्तर देईल", नंदीग्राममधील प्रचारसभेत ममता बॅनर्जी यांचा शुभेन्दु अधिकारी यांच्यावर निशाणा
शुभेंदू अधिकारी यांच्या समर्थनार्थ गृहमंत्री अमित शहा, अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनीही रॅली काढल्या. यावेळी ममता बॅनर्जी यांनी शुभेंदू अधिकारी यांचे नाव न घेता निशाणा साधला.

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये 1 एप्रिल रोजी दुसर्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार आज संपला. पश्चिम बंगालमध्ये या दुसऱ्या टप्प्यात नंदीग्राम जागेवरही मतदान होणार आहे. या जागेवर पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री त्यांचे माजी निकटवर्तीय आणि भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्यासमोर आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ममता बॅनर्जी यांनी रॅली आणि रोड शो केला. त्याचवेळी शुभेंदू अधिकारी यांच्या समर्थनार्थ गृहमंत्री अमित शहा, अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनीही रॅली काढल्या. यावेळी ममता बॅनर्जी यांनी शुभेंदू अधिकारी यांचे नाव न घेता निशाणा साधला. ममता सोनाचूरामध्ये म्हणाल्या, "ते (बाहेरून पोलिस दल) येथे काही दिवस राहतील. कोणतीही चूक करु नका. आम्ही परत येऊ आणि विश्वासघाती लोकांना योग्य उत्तर देऊ."
ममता म्हणाल्या, "मध्य प्रदेश आणि काही अन्य भाजपाशासित राज्यांतील पोलिस दलांना नंदीग्राम येथे खेड्यांतील मतदारांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आणि भाजपाच्या बाजूने निर्णय घेण्यास आणले गेले आहेत. ममता असंही म्हणाल्या (भाजपाचे) लोकांना ठार मारण्याचा आणि दंगली घडवण्याचा त्यांचा कट (कट) आहे." आम्हाला माहिती मिळाली आहे. आणि याचं खापर टीएमसीवर फोडण्याची तयारी सुरू आहे त्यामुळे काळजी घ्या. ''तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी नंदीग्रामच्या अरुंद रस्त्यांमधून जाणार्या तीन किलोमीटरच्या रोड शोमध्ये भाग घेतला. यावेळी पक्षाच्या समर्थकांनी जय हिंद, जय बांगला, ममता बॅनर्जी झिंदाबाद आणि 'मीर जाफर (दगबाज)' मुर्दाबाद अशी घोषणाबाजी केली.
ममता बॅनर्जी यांनी आरोप केले की, भाजपचे मंत्री आणि सुरक्षा दलांनी मतदारांना पैसे वाटप केले आहे. देशभरातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणली जात आहे आणि लोकांना भाजपच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान करण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी (भाजप) मंत्र्यांद्वारे "हॉटेलमधून वितरित केले जात आहेत."
लोकांना वाटप होत असलेले पैसे “हे पंतप्रधान केअर फंडाचे पैसे आहेत. नोटाबंदीच्या वेळी जमा केलेली रोकड आहे. हेच पैसे आहेत ज्यातून पीएसयूच्या विक्रीनंतर त्यांची तिजोरी भरली जाते. " ममतांनी आरोप केले की, " जनतेची लूट त्यांनी केली आणि आता ते प्रत्येक मतदारांना 500 आणि 1000 रुपये देत आहेत." आम्ही याबाबत निवडणूक आयोगाला कळवले पण त्यानंतरही ते सुरूच आहे.
बासुलीचक येथील दुसर्या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देखील आरोप केले. "केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ताफ्यात 100 हून अधिक गाड्या का आहेत? खरतर निवडणुकीत कोणत्याही ताफ्यात पाचपेक्षा जास्त वाहनांना परवानगी नाही.काहींना इतरांपेक्षा जास्त सुविधा दिली जात आहेत." असा आरोप ममता यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
