Hanuman Jayanti: दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये मिरवणुकीत गोंधळ, दगडफेक आणि तोडफोड; अनेक पोलिसही जखमी
Delhi: हनुमान जयंतीनिमित्त दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये काढण्यात आलेल्या मिरवणुकीत गोंधळ झाल्याची बातमी समोर येत आहे.
Delhi: हनुमान जयंतीनिमित्त दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये काढण्यात आलेल्या मिरवणुकीत गोंधळ झाल्याची बातमी समोर येत आहे. याबाबत दिल्ली पोलिसांनी माहिती जाहीर केली आहे. मिरवणुकीत पायी जाणाऱ्या लोकांवर दगडफेक झाल्याची चर्चा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आहे. अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दिल्ली पोलीस आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, परिस्थिती आता नियंत्रणात आहे, परिस्थिती बिघडवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. दिल्लीतील इतर भागातही सुरक्षा अधिक वाढवण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. या गोंधळात अनेक पोलीस जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुशल सिनेमाजवळ ही दगडफेक झाली आहे.
याच दरम्यान भाजप नेते कपिल मिश्रा यांनी दिल्लीतील जहांगीरपुरी येथे हनुमान जन्मोत्सवावर झालेली दगडफेक हे दहशतवादी कृत्य असल्याचे म्हटले आहे. बांगलादेशी घुसखोरांचा बंदोबस्त आता भारतातील नागरिकांवर हल्ले करण्याचे धाडस करू लागला असून, त्यांचे प्रत्येक कागदपत्र तपासून बेकायदेशीर घुसखोरांना देशातून बाहेर काढणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले आहेत.
दिल्ली के जहाँगीर पूरी में हनुमान जन्मोत्सव पर हुआ पथराव आतंकी हरकत है
— Kapil Mishra (@KapilMishra_IND) April 16, 2022
बांग्लादेशी घुसपैठियों की बस्ती अब भारत के नागरिकों पर हमलें करने की हिम्मत करने लगी है
इनके एक एक के कागज चेक करके गैर कानूनी घुसपैठियों को देश से निकालना अब जरूरी हो गया है #JahangeerPuri
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Bypoll Election Result 2022 : देशातील पोटनिवडणुकीत भाजपला धक्का, पाच जागांवर पराभवाचा धक्का
- ''राम देव नाही, केवळ रामायणातील पात्र!' माजी मुख्यमंत्र्यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, नवा वाद होण्याची शक्यता
- Cyber Crime : पाकिस्तानकडून भारताविरुद्ध मोठे षडयंत्र, वादग्रस्त हॅशटॅग ट्रेंड, संशोधनातून बाब समोर