एक्स्प्लोर

Cyber Crime : पाकिस्तानकडून भारताविरुद्ध मोठे षडयंत्र, वादग्रस्त हॅशटॅग ट्रेंड, संशोधनातून बाब समोर

Cyber Crime : 10 आणि 11 एप्रिल रोजी ट्विटरवर तीन वादग्रस्त हॅशटॅग ट्रेंड होत असल्याचे सायबर गुन्हे विश्लेषक यांच्या लक्षात आले. दोन दिवसांत या तीन हॅशटॅगसह एकूण दीड लाख ट्विट करण्यात आले आहेत

Pakistan Plotting Plans Against India : पाकिस्तान रोज भारताविरुद्ध काही ना काही कट रचत असतो. सध्या पाकिस्तानने नवा दृष्टिकोन स्वीकारला आहे. पाकिस्तान आपले सायबर क्राइमचे जाळे मजबूत करत आहे आणि या सायबर गुन्हेगारांच्या मदतीने भारतात पसरणाऱ्या द्वेषाला प्रोत्साहन देत आहे. पाकिस्तानी शाखा ISPR भारतात घडणाऱ्या कोणत्याही घटनेची प्रसिद्धी करण्यास मागेपुढे पाहत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतातील अशांततेला प्रोत्साहन देणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची प्रतिमा खराब करणे हा त्याचा एकमेव मुद्दा आहे. माहितीनुसार, ISPR चा उद्देश खालीलप्रमाणे आहे.

-भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा कशी मलीन होईल
-जागतिक घडामोडींमध्ये भारताच्या मताला कमी महत्त्व मिळेल
-भारतावर जागतिक दबाव वाढेल, विशेषत: अमेरिका आणि युरोपातील देशांना भारताला सल्ला देण्याचा दर्जा मिळेल.
-प्रतिमा खराब झाल्यास भारतातील गुंतवणूक खाली येईल.
-भारतातील पर्यटकांची संख्याही कमी होईल

रामनवमीला दोन समाजात वाद, तणावपूर्ण परिस्थिती

देशात यंदा रामनवमीच्या दिवशी अशा काही घटना घडल्या होत्या, ज्यामध्ये दोन समाजातील लोकांमध्ये विशेषत: रामनवमी आणि रमजानच्या वेळी वादाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, अनेक राज्यांना सायबर प्रकरणांवर सल्ला देणारे सायबर गुन्हे विश्लेषक अमित दुबे यांची सोशल मीडिया आणि ट्विटरवर दखल घेण्यात आली, जिथे त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली होती

पाकिस्तानमध्ये काही वादग्रस्त हॅशटॅग ट्रेंड झाले होते

10 आणि 11 एप्रिल रोजी ट्विटरवर तीन हॅशटॅग ट्रेंड होत असल्याचे सायबर गुन्हे विश्लेषक अमित यांच्या लक्षात आले. दोन दिवसांत या तीन हॅशटॅगसह एकूण दीड लाख ट्विट करण्यात आले आहेत. यातील 70% ट्विट हे परदेशातील होते. सर्व ट्विटपैकी 40% पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे होते. हे ट्विट पाकिस्तानमधून सुरू झाले. ज्या हॅशटॅगवरून ट्विट केले गेले ते हॅशटॅग आहेत.

#IndianMuslimUnderAttack

#MuslimGenocideInIndia

#IndianMuslimGenocideAlert

या हॅशटॅगसह केल्या जाणाऱ्या ट्विटमध्ये भारतात घडलेल्या एका घटनेवर जुन्या घटनेचा व्हिडिओ टाकण्यात आला आहे. अमेरिका, जर्मनी, कॅनडासह युरोपातील अनेक देशांतून या हॅशटॅगचा वापर करून ट्विटही केले जात होते. भारतातील अनेक लोक त्यांना रिट्विट करत होते, या संशोधनातून असेही समोर आले आहे की, भारतातील व्हेरिफाईड अकाऊंट असलेल्यांनी हे हॅशटॅग असलेले ट्विट रिट्विट केले होते किंवा त्यांचे मत दिले होते, त्यांनी नंतर हे ट्विट हटवले.

पाकिस्तानी वायु सेनेकडून टूल किटचे वितरण 

सायबर क्राईम विश्लेषक अनुज अग्रवाल, जे सायबर क्राईम विश्लेषणाच्या प्रकरणांमध्ये भारत सरकारच्या अनेक एजन्सींना सल्ला देतात, त्यांनी सांगितले की पाकिस्तान आपल्या सायबर आर्मीद्वारे अशी टूलकिट वितरीत करतो, ज्यामध्ये भारताच्या कोणत्याही विषयावर कधी आणि कोणत्या पार्श्वभूमावर ट्विट करावे. हे सर्व यामध्ये लिहिलेले आहे. विविध देशांमध्ये उपस्थित असलेले तुमचे बॉट्स अशा प्रकारे सक्रिय करावे लागतील की, ट्विटरवर येणाऱ्या प्रतिक्रिया सामान्य पॅटर्ननुसार दाखवल्या जातील. म्हणजेच कोणत्याही एका देशाकडून प्रतिक्रिया येऊ नयेत.

'या' देशांकडून ट्विट करण्यात आले

पाकिस्तान – 43081 (सर्वाधिक ट्वीट)
अफगाणिस्तान - 16045
भारत- 29423
युनायटेड किंगडम- 231
जर्मनी - 783
सौदी अरेबिया - 1731
रोमानिया - 487
तुर्की - 1497
इंडोनेशिया- 7534
मलेशिया - 1367

एक व्यक्तीकडून पन्नास ट्विट
एकूण किती लोकांनी एकत्र ट्विट केले आहे हे सध्या माहित नाही, परंतु 10 आणि 11 एप्रिलच्या या ट्विटच्या संदर्भात असे म्हणता येईल की, एक व्यक्ती सुमारे पन्नास ट्विट करत होती. कॅनडाच्या न्यू डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते जगमीत सिंग यांनी भारतातील मुस्लिमांबाबत चिंता व्यक्त केली आहे. जगमीत सिंग यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, मोदी सरकारने मुस्लिमविरोधी भावना पेटवणे थांबवावे. जगमीत सिंह यांनी लिहिले की, भारतातील मुस्लिमांना लक्ष्य करणाऱ्या हिंसाचाराचे फोटो, व्हिडिओ पाहून मी खूप चिंतेत आहे. मोदी सरकारने मुस्लिमविरोधी भावना भडकावण्याचे थांबवावे. मानवी हक्कांचे संरक्षण केले पाहिजे. जगभरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी कॅनडाने आपली मजबूत भूमिका बजावली पाहिजे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Harnawal on Neelam Gorhe : निलम गोऱ्हे विधिमंडळात लक्षवेधी आणून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायच्या; राऊतांनी उल्लेख केलेल्या पुण्यातील अशोक हरणावळांचा खळबळजनक आरोप
निलम गोऱ्हे विधिमंडळात लक्षवेधी आणून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायच्या; राऊतांनी उल्लेख केलेल्या पुण्यातील अशोक हरणावळांचा खळबळजनक आरोप
मोहम्मद रिजवान भित्रा निघाला, बाबर आझम, तर एकदम बेकार! माजी पाकिस्तानी हिंदू क्रिकेटपटूच्या संतापाचा कडेलोट; फायनलला भारतासोबत कोण भिडू होणार? टीमचं नाव सांगितलं
मोहम्मद रिजवान भित्रा निघाला, बाबर आझम, तर एकदम बेकार! माजी पाकिस्तानी हिंदू क्रिकेटपटूच्या संतापाचा कडेलोट; फायनलला भारतासोबत कोण भिडू होणार? टीमचं नाव सांगितलं
EPF Rate : 7 कोटी ईपीएफ खातेधारकांना गुड न्यूज, व्याजदासंदर्भात मोठी अपडेट, लवकरच महत्त्वाची बैठक
EPF Rate : 7 कोटी ईपीएफ खातेधारकांना गुड न्यूज, व्याजदासंदर्भात मोठी अपडेट, याच आठवड्यात बैठक
Shripal Sabnis: देशातील चातुर्वण्य व्यवस्थेच्या मुळाशी ब्राह्मण, मी माझ्या पूर्वजांच्या चुकांची माफी मागतो: श्रीपाल सबनीस
देशातील चातुर्वण्य व्यवस्थेच्या मुळाशी ब्राह्मण, मी माझ्या पूर्वजांच्या चुकांची माफी मागतो: श्रीपाल सबनीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 AM : 24 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 24 Feb 2025 : ABP MajhaSanjay Raut Full PC : निर्लज्ज, नमकहराम, भूत, बाईमाणूस; संजय राऊत नीलम गोऱ्हेंना काय काय म्हणाले?Shiv Sena vs BJP Thane : Eknath Shinde यांच्या ठाण्यात भाजपचा जनता दरबार; Ganesh Naik EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Harnawal on Neelam Gorhe : निलम गोऱ्हे विधिमंडळात लक्षवेधी आणून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायच्या; राऊतांनी उल्लेख केलेल्या पुण्यातील अशोक हरणावळांचा खळबळजनक आरोप
निलम गोऱ्हे विधिमंडळात लक्षवेधी आणून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायच्या; राऊतांनी उल्लेख केलेल्या पुण्यातील अशोक हरणावळांचा खळबळजनक आरोप
मोहम्मद रिजवान भित्रा निघाला, बाबर आझम, तर एकदम बेकार! माजी पाकिस्तानी हिंदू क्रिकेटपटूच्या संतापाचा कडेलोट; फायनलला भारतासोबत कोण भिडू होणार? टीमचं नाव सांगितलं
मोहम्मद रिजवान भित्रा निघाला, बाबर आझम, तर एकदम बेकार! माजी पाकिस्तानी हिंदू क्रिकेटपटूच्या संतापाचा कडेलोट; फायनलला भारतासोबत कोण भिडू होणार? टीमचं नाव सांगितलं
EPF Rate : 7 कोटी ईपीएफ खातेधारकांना गुड न्यूज, व्याजदासंदर्भात मोठी अपडेट, लवकरच महत्त्वाची बैठक
EPF Rate : 7 कोटी ईपीएफ खातेधारकांना गुड न्यूज, व्याजदासंदर्भात मोठी अपडेट, याच आठवड्यात बैठक
Shripal Sabnis: देशातील चातुर्वण्य व्यवस्थेच्या मुळाशी ब्राह्मण, मी माझ्या पूर्वजांच्या चुकांची माफी मागतो: श्रीपाल सबनीस
देशातील चातुर्वण्य व्यवस्थेच्या मुळाशी ब्राह्मण, मी माझ्या पूर्वजांच्या चुकांची माफी मागतो: श्रीपाल सबनीस
Vinayak Pande on Neelam Gorhe : संजय राऊतांची प्रेस कॉन्फरन्स संपताच नाशिकच्या विनायक पांडेंनी सगळंच बाहेर काढलं, म्हणाले, नीलम गोऱ्हेंनी माझ्याकडून...
संजय राऊतांची प्रेस कॉन्फरन्स संपताच नाशिकच्या विनायक पांडेंनी सगळंच बाहेर काढलं, म्हणाले, नीलम गोऱ्हेंनी माझ्याकडून...
Kiran Mane : 'पण विशाळगडावर मशिद आहे यासाठी शिरा ताणून बोंबलणारा बहुजन पोरगा तुमच्या आसपास किंवा तुमच्या घरात असंल तर...' किरण मानेंच्या पोस्टची जोरदार चर्चा
'पण विशाळगडावर मशिद आहे यासाठी शिरा ताणून बोंबलणारा बहुजन पोरगा तुमच्या आसपास किंवा तुमच्या घरात असंल तर...' किरण मानेंच्या पोस्टची जोरदार चर्चा
शिक्षेला आव्हान देण्यासाठी माणिकराव कोकाटेंची न्यायालयात धाव, अडचणीत वाढ होणार की दिलासा मिळणार? आज फैसला
शिक्षेला आव्हान देण्यासाठी माणिकराव कोकाटेंची न्यायालयात धाव, अडचणीत वाढ होणार की दिलासा मिळणार? आज फैसला
Tamil Nadu Language Controversy : तमिळनाडूत 'हिंदी'विरोधात पुन्हा रान उठण्याची चिन्हे, 60 वर्षांपूर्वींच्या भळभळत्या जखमेवरील खपली निघाली, फलकांना काळं फासण्यास सुरुवात
तमिळनाडूत 'हिंदी'विरोधात पुन्हा रान उठण्याची चिन्हे, 60 वर्षांपूर्वींच्या भळभळत्या जखमेवरील खपली निघाली, फलकांना काळं फासण्यास सुरुवात
Embed widget