दिल्लीवाले कधी कोणता कायदा आणतील याचा नेम नाही; गीतकार गुलजार यांचा मोदी-शाहांवर निशाणा
ज्येष्ठ गीतकार आणि कवी गुलजार यांनी CAA आणि NRC बाबत त्यांची भूमिका मांडत असताना केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे.
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात (CAA) देशभरातून विरोध होत आहे. तसेच अनेक मोठ्या सेलिब्रेटींनीदेखील त्यास विरोध करत आपले मत मांडले आहे. ज्येष्ठ गीतकार आणि कवी गुलजार यांनीदेखील याबाबत त्यांची भूमिका मांडली आहे. गुलजार यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. गुलजार म्हणाले की, मला दिल्लीवाल्यांची (दिल्लीतल्या केंद्र सरकारची) भीती वाटते. कोणास ठावूक हे लोक कधी कोणता नवीन कायदा आणतील. एका खासगी वृत्तसमुहाने दिल्लीत आयोजित केलेल्या साहित्य पुरस्कार समारंभात गुलजार बोलत होते.
गुलजार म्हणाले की, अमर उजाला या वृत्तसमुहाचे सल्लागार यशवंत व्यास दिल्लीवरुन मला भेटण्यासाठी येत होते, तेव्हा मी घाबरलो होतो. गुलजार हसत म्हणाले की, हे दिल्लीवाले लोक कधी कोणता कायदा आणतील, याचा काही नेम नाही. यशवंत सिन्हा हे अमर उजालाने आयोजित केलेल्या साहित्य पुरस्कार समारंभाचे निंमत्रण देण्यासाठी गुलजार यांच्याकडे गेले होते.
यावेळी गुलजार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चिमटे काढणारे वक्तव्य केले. गुलजार म्हणाले की, मी तुम्हाला मित्रो असं संबोधित करणार होतो, परंतु मी थांबलो आणि विचार केला की असं नको करायला. गुलजार यांचे हे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करणारे होते. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक भाषणाची सुरुवात 'मित्रो...' अशी करतात.
वाचा :
नागरिकत्व धोक्यात कसं? राहुल गांधींनी सिद्ध करावं; अमित शाहांचं चॅलेन्ज NRC | एनआरसीच्या मुद्द्यावर भाजप एकटी पडत चाललीय का? मित्रपक्षांच्या भूमिकांनी मोदी सरकार बॅकफूटवर देशावर तुकडे तुकडे गँगची सत्ता; तुषार गांधींचा मोदी-शाहांना टोला CAA : दिल्लीतल्या हिंसाचारामागे काँग्रेसची तुकडे-तुकडे गँग; अमित शाहांचा आरोप त्यांनी इटलीवरून येत नागरिकत्व घेतलं, इतरांना रोखतायत; भाजप नेत्याचा सोनिया गांधींना टोला