एक्स्प्लोर
त्यांनी इटलीवरून येत नागरिकत्व घेतलं, इतरांना रोखतायत; भाजप नेत्याचा सोनिया गांधींना टोला
'सोनिया गांधी यांनी स्वतः इटलीवरून येत भारताचं नागरिकत्व घेतलं, परंतु आता इतरांना नागरिकत्व देण्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत.', भाजपचे जेष्ठ नेते अनिल विज यांचं वक्तव्य
चंदीगड : हरियाणाचे कॅबिनेट मंत्री आणि नेहमी आपल्या वक्यव्यांमुळे चर्चेत राहणारे भाजपचे जेष्ठ नेते अनिल विज हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. सध्या काँग्रेसकडून नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि एनआरसीवर कडाडून विरोध करण्यात येत आहे. अनिल विज यांनी याच मुद्यावरून काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. याबाबत बोलताना विज म्हणाले की, 'सोनिया गांधी यांनी स्वतः इटलीवरून येत भारताचं नागरिकत्व घेतलं, परंतु आता इतरांना नागरिकत्व देण्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत.'
पाहा व्हिडीओ : काँग्रेसच्या नेतृत्वात तुकडे-तुकडे गँगने दिल्लीत अशांतता पसरवली : अमित शाह
लोकांमध्ये भांडणं लावण्याची युनियन चालवत आहेत सोनिया आणि ममता : अनिल विज
अनिल विज यांनी बोलताना सांगितले की, 'देशात अशांतता पसरवण्यासाठी सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जींसारख्या नेत्यांनी युनियन तयार केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खानही काही युनियनचे भाग आहेत. या युनियनचं काम आहे, देशातील लोकांमध्ये आपापसांत भांडणं लावणं.' पुढे बोलताना ते म्हणाले की, 'सोनिया गांधी स्वतः इटलीमधून आल्या आणि भारताचं नागरिकत्व घेतलं. परंतु, आता इतरांच्या नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित करत आहेत.'
नागरिकत्व देण्यासाठी आहे CAA : अनिल विज दरम्यान, काल रोहतकमध्ये भाजपने नाकरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी स्थानिक कार्यकत्यांनी एक बैठक घेतली, ज्यामध्ये या कायद्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी कोणत्या प्रकारे अभियान चालवणं गरजेचं आहे, यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीसाठी हरियाणा सरकारचे गृहमंत्री अनिल विजही उपस्थित होते. त्यावेळी त्यांना नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला होणाऱ्या विरोधाबाबत तुमचं मत काय, असं विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं की, ' नागरिकता संशोधन कायदा नागरिकत्व काढून घेण्यासाठी नाहीतर नागरिकत्व देण्यासाठी तयार करण्यात आला आहे.' संबंधित बातम्या : दिल्लीतल्या हिंसाचाराला काँग्रेस नेतृत्व जबाबदार : अमित शाह AMIT SHAH | हिंसक आंदोलनादरम्यान संवाद साधण्यास कमी पडलो : अमित शाह CAA : मुस्लिमांसाठी जगभरात 150 देश मात्र हिंदूंसाठी फक्त भारतचं, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचं वक्तव्य CAA हा काळा कायदा, मुसलमानांना देशातून हाकलण्याचा कट; असदुद्दीन ओवेसींचा आरोपHaryana Home Minister, Anil Vij: Sonia Gandhi came here from Italy & took citizenship but these people are opposing when our Hindu&Sikh brothers, who were persecuted in Pakistan are getting citizenship.Pakistan PM is also a part of their union,they speak the same language.(26.12) pic.twitter.com/9PP8fIUzxC
— ANI (@ANI) December 26, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement