एक्स्प्लोर

Gujarat Election Result Nota: गुजरातमध्ये तीन जागांवर 'नोटा'ने केला भाजपचा घात, माजी मंत्र्याला गमवावी लागली आमदारकी

Gujarat Election Result: भाजपला तीन जागांवर नोटा पर्यायामुळे पराभव स्वीकारावा लागला आहे. या तीन मतदारसंघात काँग्रेसने बाजी मारली.

Gujarat Election Result: गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत (Gujarat Election) ऐतिहासिक कामगिरी करत भाजपने 156 जागांवर विजय मिळवला. पण, भाजपच्या या प्रचंड विजयात आणखी तीन जागांची भर पडली असती. कोणताही उमेदवार नाही अर्थात 'नोटा' (NOTA) या पर्यायाने भाजपचा तीन जागांवर घात केला आहे. नोटाला झालेल्या मतदानामुळे भाजप उमेदवारांचा थोडक्यात पराभव झाला आहे. एका माजी मंत्र्यालादेखील याचा फटका बसला आहे. त्यांना आपली आमदारकी गमवावी लागली आहे. गुजरातमध्ये भाजपच्या विजयासोबत सोमनाथ, चान्समा आणि खैरब्रह्म या जागांची जोरदार चर्चा सुरू आहे. 

सोमनाथमध्ये नोटाला 1530 मते 

सोमनाथची जागा जिंकण्यासाठी भाजपने यावेळी पूर्ण ताकद झोकून दिली होती. उमेदवार निवडीपासून ते निवडणूक प्रचारापर्यंत भाजपने अनेक प्रयोग केले. काँग्रेसच्या कानाभाई चुडासामा यांच्या विरोधात भाजपने प्रखर मानसिंग परमार यांना उमेदवारी दिली होती.

गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा, रॅली आयोजित करण्यात आली होती. मात्र, नोटाने भाजपच्या या प्रयत्नांवर पाणी फेरले. काँग्रेसचे उमेदवार कनाभाई यांना 73819 तर भाजपचे मानसिंग परमार यांना 72897 मते मिळाली. तर, 1530 मतदारांनी NOTA ला पसंती दिली. 

खैरब्रह्ममध्ये नोटाला 7331 मते, भाजपचा 1664 मतांनी पराभव

साबरकाठा जिल्ह्यातील खैरब्रह्म जागेवर नोटाला 7331 मते मिळाली. या ठिकाणी काँग्रेस उमेदवार तुषार चौधरी यांनी भाजप उमेदवार अश्विन कोटवाल यांचा 1664 मतांनी पराभव केला. चौधरी यांना 67349 मते आणि कोटवाल यांना 65685  मते मिळाली. भाजपने या निवडणुकीत 60 विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली होती. त्यापैकी 53 आमदार पुन्हा विजयी झाले. खैरब्रह्म जागेवरही विद्यमान आमदारांना पराभव स्वीकारावा लागला. 

आधी मंत्रीपद नंतर आमदारकी गेली

2021 मध्ये गुजरातमधील मंत्रिमंडळ फेरबदलात दिलीप ठाकोर यांना मंत्रिमंडळातून पायउतार व्हावे लागले होते. मात्र, भाजप नेतृत्वाने ठाकोर यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. पाटणमधील चान्समा येथून उमेदवारी देण्यात आली. मात्र NOTA मुळे त्यांना निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.

या मतदारसंघात काँग्रेसचे दिनेश भाई यांना 86404  मते मिळाली. ठाकोर यांना 85002 मते मिळाली. तर, 3293 मतदारांनी NOTA च्या बाजूने मतदान केले.

गुजरातमध्ये 'नोटा'ला पाच लाख मते

गुजरात विधानसभा निवडणुकीत 182 मतदारसंघात 'नोटा'ला 501202 मतदारांनी पसंती दिली. ही संख्या एकूण मतांच्या 1.57 टक्के इतकी आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chornobyl Nuclear Power Plant : चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
Why are airplane routes curved : दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
एकावेळी तुम्ही बँकेत किती पैसे ठेऊ शकतात? बँक बंद पडली तर तुम्हा किती पैसे मिळतात? काय सांगतो RBI चा नियम? 
एकावेळी तुम्ही बँकेत किती पैसे ठेऊ शकतात? बँक बंद पडली तर तुम्हा किती पैसे मिळतात? काय सांगतो RBI चा नियम? 
Chhaava Movie:
छावा चित्रपटातील 'त्या' एका डायलॉगने अख्खं चित्रपटगृह सुन्नं, आपला राजा काय होता एका वाक्यात कळलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या ऑपरेशननंतर भेट, तब्येतीची विचारपूस केली : धसSuresh Dhas meets Dhananjay Munde : धस - मुंडे यांची गुप्तभेट, खासगी रुग्णालयात नेमकं काय घडलं?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 14 Feb 2025 : ABP MajhaSuresh Dhas Full PC : काही लोक आक्कांना मदत करताना दिसतात, त्यांच्यावर कारवाई करा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chornobyl Nuclear Power Plant : चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
Why are airplane routes curved : दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
एकावेळी तुम्ही बँकेत किती पैसे ठेऊ शकतात? बँक बंद पडली तर तुम्हा किती पैसे मिळतात? काय सांगतो RBI चा नियम? 
एकावेळी तुम्ही बँकेत किती पैसे ठेऊ शकतात? बँक बंद पडली तर तुम्हा किती पैसे मिळतात? काय सांगतो RBI चा नियम? 
Chhaava Movie:
छावा चित्रपटातील 'त्या' एका डायलॉगने अख्खं चित्रपटगृह सुन्नं, आपला राजा काय होता एका वाक्यात कळलं!
मोठी बातमी! न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर RBI ची कारवाई, संचालक मंडळ बरखास्त 
मोठी बातमी! न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर RBI ची कारवाई, संचालक मंडळ बरखास्त 
EPFO News : ईपीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज लवकरच, ईपीएफओ व्याज दर जाहीर करणार, 12 टक्के व्याज कधी मिळालेलं?
ईपीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज लवकरच, ईपीएफओ व्याज दर जाहीर करणार, 12 टक्के व्याज कधी मिळालेलं?
रायगडचं पालकमंत्रीपद मिळणार का? मंत्री गोगावले म्हणाले तुळजाभवानीला साकडं घालणार
रायगडचं पालकमंत्रीपद मिळणार का? मंत्री गोगावले म्हणाले तुळजाभवानीला साकडं घालणार
Gold Rate : व्हॅलेंटाईन डे दिवशी सोनं चांदीमध्ये तेजी,10 ग्रॅम सोनं खरेदीसाठी किती रुपये द्यावे लागणार?
सोने अन् चांदीच्या दरात तेजीचं सत्र कायम, सोने महागलं, चांदीचं काय?
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.