Delhi Curfew Restrictions : महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीत आता पूर्ण लॉकडाऊन जाहीर, जाणून घ्या काय सुरू, काय बंद!
Delhi Coronavirus Curfew Full Restrictions : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती आणखी बिघडलेली असतानाच दिल्लीमध्ये आज रात्रीपासून पुढच्या सोमवारपर्यंत सक्तीचा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट देशात गडत होतोना दिसत आहे. महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीनंही आता पूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. हा लॉकडाऊन सहा दिवसांचा असणार आहे.
महाराष्ट्रापाठोपाठ आता दिल्लीतही पूर्ण लॉकडाऊनची वेळ आली आहे. दिल्लीत आज रात्री 10 वाजल्यापासून ते सोमवारी 26 एप्रिल पहाटे 5 पर्यंत 6 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज नायब राज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेतली आणि त्यानंतर या लॉकडाऊनची घोषणा केली.
दिल्लीत कोरोना वाढीचा वेग भयानक वाढला आहे. गेल्या 24 कोरोनाचे तब्बल 25,362 हजार नवे रुग्ण सापडले. गेले तीन दिवस हा आकडा सातत्यानं 25 हजाराच्या आसपासच आहे. शिवाय दिल्लीचा पॉझिटिव्हिटी रेट हा 30 टक्क्यांच्या आसपास पोहचला आहे. म्हणजे टेस्ट केलेल्या तीन लोकांपैकी एक दिल्लीत पॉझिटिव्ह सापडत आहे.
लॉकडाऊनचा समर्थक नव्हतो पण तरीही लावावा लागला. कारण आरोग्य व्यवस्था कोलमडून पडण्याची भीती होती. पुढच्या सहा दिवसांत दिल्लीकरांनी शहर सोडू नये असंही आवाहन केजरीवाल यांनी केलं आहे.
दिल्लीत काय सुरु, काय बंद असणार?
- मेट्रो, बस सेवा सुरु, मात्र केवळ अत्यावश्यक सेवेसाठी
- पेट्रोल पंप, गॅस स्टेशन, एटीएम सुरु राहणार
- धार्मिक स्थळंही खुली राहणार, मात्र बाहेरून कुणालाही आत जाण्यास मनाई
- हॉटेल्स बंद राहणार, पण टेक-अवे, होम डिलीव्हरी सेवा सुरु
- जिम, स्पा, मॉल्स पूर्णपणे बंद राहणार
- खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होम करावं लागणार
अगदी 17 दिवसांपूर्वी 2 एप्रिलला केजरीवाल यांनी दिल्लीत लॉकडाऊनची शक्यता फेटाळून लावली होती. पण याच 17 दिवसांत दिल्लीतली स्थिती इतकी वेगानं बदलली की लॉकडाऊन शिवाय पर्याय उरला नाही. कारण 2 एप्रिलला जिथं दिवसाला 3 हजार केसेस सापडत होत्या, तिथं आज दिल्लीत दिवसाला 25 हजार केसेस सापडत आहेत.
महाराष्ट्रापाठोपाठ दिल्ली हे आता पूर्णवेळ लॉकडाऊन लावणारं दुसरं राज्य ठरलंय. त्यामुळे आता कोरोनाच्या या दुस-या लाटेचं सावट देशावर अधिकाधिक गडद होत चाललं आहे का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
संबंधित बातम्या :
Delhi Curfew News | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं दिल्लीत आठवड्याभराचा कडक लॉकडाऊन