एक्स्प्लोर

Delhi Curfew News | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं दिल्लीत आठवड्याभराचा कडक लॉकडाऊन

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती आणखी बिघडलेली असतानाच दिल्लीमध्ये आज रात्रीपासून पुढच्या सोमवारपर्यंत सक्तीचा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

Delhi Curfew News कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती आणखी बिघडलेली असतानाच दिल्लीमध्ये आज रात्रीपासून पुढच्या सोमवारपर्यंत सक्तीचा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भातील माहिती देत खासगी आस्थापनांना वर्क फ्रॉम होमचे निर्देश दिले आहेत. 

सोमवारी म्हणजेच आज रात्री 10 वाजल्यापासून पुढच्या सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजेच (26 एप्रिलपर्यंत) हा लॉकडाऊन लागू असेल. या नियमांअंतर्गत अत्यावश्यक सेवा, अन्नपुरवठा, वैद्यकिय सेवा सुरुच राहणार आहेत. तर, लग्नसोहळ्यांमध्ये 50 उपस्थितांचा आकडा बंधनकारक असेल, अशी माहिती शासनातर्फे देण्यात आली. 

पुढील सहा दिवसांमध्ये लॉकडाऊन काळात, दिल्लीमध्ये बेड्सची व्यवस्था करण्यात येणार आहे, असं म्हणत केजरीवाल यांनी आपल्याला केलेल्या सहकार्यासाठी केंद्राचे आभारही मानले. लॉकडाऊनच्या या काळात निर्बंध लागू असताना ऑक्सिजन, औषधं अशा सुविधा मार्गी लावण्यासाठीची पावलं उचलण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. याशिवाय त्यांनी नागरिकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं. 

दिल्लीतील कोविड परिस्थिती 

रविवारी दिल्लीमध्ये कोविडचे सर्वाधिक म्हणजेच, 25,462 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. या भागात संसर्गाचं प्रमाण वाढीस लागलं असून, त्याची सरासरी 29.74 वर पोहोचली आहे. याचाच अर्थ असा, की चाचणीचा दर तिसरा नमुना पॉझिटीव्ह असल्याचं आढळून येत आहे. मागील 24 तासांत दिल्लीमध्ये 161 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. 

देशातही कोरोनाचा आकडा धास्तावणारा 

देशात कोरोना बाधितांच्या संख्येनं आतापर्यंत सर्व उच्चांक मोडीत काढले आहेत. दररोज कोरोनाबाधितांचा आकडा नवा उच्चांक गाठत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 273,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 1619 कोरोनाबाधित रुग्णांना आपले प्राण गमवाव लागले आहेत. दरम्यान, 1,44,178 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याआधी राज्यात शनिवारी 261,500 नव्या कोरोन बाधितांची नोंद झाली होती. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Rajasthan Panchayat Elections : राजस्थान जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसची लाट, 37 पैकी 27 जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता,राजधानी जयपूरमध्येही भाजपचा पराभव
काँग्रेसची राजस्थानात लाट, जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचा पराभव, मुख्यमंत्री शर्मांना धक्का 
Vantara : जन्मतःच पाय फ्रॅक्चर झालेल्या सात आठवड्यांच्या 'राजा' हत्तीच्या पिल्लाला जीवदान, आसाममधून थेट गुजरातमधील 'वनतारा'मध्ये एअरलिफ्ट
जन्मतःच पाय फ्रॅक्चर झालेल्या सात आठवड्यांच्या 'राजा' हत्तीच्या पिल्लाला जीवदान, आसाममधून थेट गुजरातमधील 'वनतारा'मध्ये एअरलिफ्ट
Yash Patil : वय 23 वर्षे अन् AI कंपनीची किंमत 42 हजार कोटी! कोण आहेत यश पाटील? एआय स्टार्टअपचा अमेरिकेत वाजवला डंका, सतेज पाटलांकडूनही कौतुक
वय 23 वर्षे अन् AI कंपनीची किंमत 42 हजार कोटी! कोण आहेत यश पाटील? एआय स्टार्टअपचा अमेरिकेत वाजवला डंका, सतेज पाटलांकडूनही कौतुक
PF Account EPFO: नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, पीएफ काढण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल, दोन महिन्यांत सगळा पूर्ण PF काढता येणार
नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, पीएफ काढण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल, दोन महिन्यांत सगळा पूर्ण PF काढता येणार

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोठ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोठ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Mohammed Siraj: सिराजला डावलल्यानं माजी क्रिकेटपटू भडकले, टीम इंडियाच्या वादात काँग्रेस खासदाराची उडी, नेमकं काय म्हणाले?  
सिराज नावामुळं त्याला संघात स्थान मिळत नाही, काँग्रेस खासदाराची टीम इंडियाच्या संघ निवडीच्या वादात उडी
Gondia Crime News : 13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
Embed widget