एक्स्प्लोर
इम्पोर्टेड मोबाईल-टीव्ही महागणार, कस्टम ड्युटीमध्ये वाढ
इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील कस्टम ड्युटी 10 टक्क्यांवरुन 15 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आल्यामुळे वस्तूंच्या मूळ किमतीत वाढ झाली आहे.
नवी दिल्ली : एकीकडे, वर्षअखेरीच्या निमित्ताने शॉपिंग वेबसाईट्स विविध उत्पादनांचे सेल आणत आहेत, तर दुसरीकडे इम्पोर्टेड इलेक्ट्रॉनिक वस्तू मात्र महागणार आहेत. केंद्र सरकारनं मोबाईल, टीव्ही सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या कस्टम ड्युटीमध्ये वाढ केली आहे.
इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील कस्टम ड्युटी 10 टक्क्यांवरुन 15 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आल्यामुळे वस्तूंच्या मूळ किमतीत वाढ झाली आहे. टीव्ही आणि मायक्रोवेव्हवरील कस्टम ड्युटी 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आल्यामुळे या उत्पादनांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
स्थानिक उद्योगांना उत्तेजन देण्यासाठी आणि परदेशी उत्पादनांच्या आयातीवर अंकुश ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मेक इन इंडिया' अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठीच
मोबाईल हँडसेटवरील कस्टम ड्युटी 15 टक्क्यांवर नेण्यात आल्यामुळे आयफोनच्या किमती वाढणार आहेत. 1 हजार कोटी डॉलरचं स्मार्टफोन मार्केट असलेल्या भारतात अॅपलच्या महसुलात घट होताना दिसत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement