Corona Vaccine Update: 'या' चार लसींना काही दिवसात मंजुरी मिळण्याची शक्यता
कोविशिल्ड लसीचे 1.1 कोटी डोस सरकारने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून खरेदी केले आहेत. कर वगळता प्रत्येक डोसची किंमत 200 रुपये असणार आहे.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसवरील 'कोविशील्ड' लस देशातील 14 शहरांमध्ये पोहोचली आहे. लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून सुरू होईल. दरम्यान, येत्या काही दिवसांत आणखी चार लसांना मंजुरी मिळू शकेल, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. देशात दोन लसांना परवानगी देण्यात आली आहे. इतर चार लसींची निर्मिती सुरु आहे. या लसी लवकरच वापरासाठी उपलब्ध होतील, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.
भारतात सध्या चार लसीच्या चाचण्या सुरू आहेत. येत्या काळात जॅस कॅडिला, स्पुतनिक व्ही, बायोलॉजिकल ई आणि जेनोव्हा या चार कंपन्या आपातकालीन स्थितीत वापराची परवानगी दिली जाऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोमवारी चार नव्या लसींवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, देशासाठी अभिमानाची बाब आहे की आपातकालीन वापरासाठी मंजूर झालेल्या दोन लस मेड इन इंडिया आहेत. एवढेच नव्हे तर आणखी चार लसींवर काम केले जात आहे. जेव्हा या लसी तयार होतील तेव्हा आपल्याकडे भविष्यासाठी नियोजन करण्याची अधिक सुविधा असेल.
कोणत्या कंपनीची कोरोना लस घ्यायची हा अधिकार नागरिकांना आहे का? सरकारचं उत्तर...
देशात सध्या 'कोविशिल्ड' आणि 'कोवॅक्सीन' या दोन लसीला DCGIने मान्यता दिली आहे. ऑक्सफोर्डच्या कोविशिल्ड लसीची निर्मित सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया करत आहे. कोवॅक्सिनची निर्मिती भारत बायोटेक करत आहे. कोविशिल्ड लसीचे 1.1 कोटी डोस सरकारने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून खरेदी केले आहेत. कर वगळता प्रत्येक डोसची किंमत 200 रुपये असणार आहे.
पुण्याहून कोरोना वॅक्सिनची पहिली बॅच रवाना; देशभरातील 13 ठिकाणी आज लस पोहोचवणार
कोवॅक्सिनचे 55 लाख डोस भारत बायोटेककडून खरेदी केले जाणार असल्याचेही सरकारने सांगितलं आहे. यापैकी कोवॅक्सिनच्या 38.5 लाख डोसची किंमत प्रत्येकी 295 रुपये (कर वगळता) किंमत असेल. तर भारत बायोटेक 16.5 लाख डोस विनामूल्य देणार आहे.
सरकारकडून कोरोना लसींंच्या 6 कोटी डोसची ऑर्डर; आज गुजरातमध्ये पहिली बॅच होणार दाखल