Corona Vaccine | पुण्याहून कोरोना वॅक्सिनची पहिली बॅच रवाना; देशभरातील 13 ठिकाणी आज लस पोहोचवणार
Corona Vaccine : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशिल्ड लसीच्या पहिल्या बॅचचे ट्रक रवाना झाले आहेत. पोलिसांच्या सुरक्षेत हे ट्रक पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचवण्यात आले. तिथून कार्गो विमानांद्वारे ही लस देशभरात पाठवली जाणार आहे.
पुणे : आजपासून सीरम इन्स्टिट्यूने आपल्या कोविड-19 कोरोना वॅक्सिन कोविशील्डचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशील्ड लसीची पहिली बॅच रवाना झाली आहे. सीरम इन्स्टिट्युटमधून कोरोना वॅक्सिनचे तीन ट्रक पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले आहेत. एअरपोर्टहून वॅक्सिनचे डोस देशभरात पाठवण्यात येणार आहेत. देशात प्रत्यक्ष लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशिल्ड लसीच्या पहिल्या बॅचचे ट्रक रवाना झाले आहेत. पोलिसांनी सीरम इन्स्टिट्यूटपासून या वाहनाला एअरपोर्टपर्यंत सुरक्षा पुरवली. त्याआधी पोलिसांकडून लस घेऊन जाणाऱ्या या गाडीची पुजाही करण्यात आली. ही लस पुणे एअरपोर्टवरुन कार्गो विमानांद्वारे देशभरात पाठवली जाणार आहे. आज अशाप्रकारची आणखी तीन वाहनं लसीचे डोस घेऊन पुणे एअरपोर्टला रवाना होणार आहेत. काल केंद्र सरकारने कोविशील्ड लसीचे एक कोटी दहा लाख डोस पुरवण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटला ऑर्डर दिल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटकडून आजपासून ही लस पाठवणं सुरु करण्यात आलं आहे.
#WATCH | First consignment of Covishield vaccine dispatched from Serum Institute of India's facility in Pune, Maharashtra. pic.twitter.com/QDiwLXka2g
— ANI (@ANI) January 11, 2021
पुणे झोन-5 च्या डीसीपी नम्रता पाटील यांनी बोलताना सांगितलं की, "कोरोना वॅक्सिनची पहिली बॅच पोलिसांच्या सुरक्षेत पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथून रवाना झाली आहे."
पुणे एअरपोर्टहून वॅक्सिनच्या एअर ट्रान्सपोर्टची जबाबदारी सांभाळणारी कंपनी एसबी लॉजिस्टिकचे एमडी संदीप भोसले यांनी सांगितलं की, एकूण आठ फ्लाइट्स कोविशील्ड लस पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन देशातील 13 ठिकाणी पोहोचवली जाणार आहे. पहिली तुकडी दिल्ली विमानतळासाठी रवाना करण्यात आली आहे.
पाहा व्हिडीओ : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशिल्ड लसीच्या पहिल्या बॅचचे ट्रक रवाना
10 वाजून 45 मिनिटांनी गुजरातमध्ये दाखल होणार लस
कोविड-19 च्या लसीची पहिली बॅच आज गुजरातमध्ये पोहोचणार आहे. सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी गुजरातच्या अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर लसींची पहिली बॅच उपलब्ध होणार आहे. उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांना सांगितलं की, लसीकरणाशी संबंधित सर्व तयाऱ्या पूर्ण झाल्या आहेत. गुजरातमध्ये कोविड-19 लसीकरण अभियान 25,000 सेंटर्सवर सुरु होणार आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधान मोदी 16 जानेवारी रोजी गुजरातच्या 287 सेंटर्सवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडले जातील. यादरम्यान अहमदाबाद आणि राजकोटमधील दोन ठिकाणांवरील डॉक्टर्स आणि लस टोचून घेणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
सरकारकडून कोरोना लसींंच्या 6 कोटी डोसची ऑर्डर; आज गुजरातमध्ये पहिली बॅच होणार दाखल