एक्स्प्लोर

500 पैकी 499 गुण, चार विद्यार्थी CBSE दहावीत अव्वल!

CBSE 10th result 2018 LIVE : यावर्षी दहावीचा निकाल 86.70 टक्के लागला. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली.

CBSE 10th result 2018 LIVE : नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे 500 पैकी 499 गुण मिळवत एक, दोन नव्हे तर चार विद्यार्थी बोर्डात अव्वल आले आहेत. या चार विद्यार्थ्यांमध्ये तीन मुलींचा समावेश आहे. प्रखर मित्तल (डीपीएस गुरुग्राम), रिमझिम अग्रवाल (आरपी पब्लिक स्कूल), नंदिनी गर्ग (शामली) आणि श्रीलक्ष्मी (भवानी विद्यालय कोच्ची) यांनी 499 गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे. निकालात मुलींची बाजी यावर्षी दहावीचा निकाल 86.70 टक्के लागला. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मुलींचा निकाल मुलांपेक्षा 3.35 टक्क्यांनी जास्त आहे. त्रिवेंद्रम विभाग अव्वल तर विभागवार निकालात यंदा 99.60 टक्क्यांसह त्रिवेंद्रम विभागाने पहिलं स्थान मिळवलं. तर चेन्नई 97.37 टक्क्यांसह दुसरं आणि अजमेर 91.86 टक्क्यांसह तिसरं स्थान पटकावलं. दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये अनुष्का प्रथम दहावी बोर्डात यंदा दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये 489 गुणांसह अनुष्का पांडा आणि सान्या गांधी यांनी पहिला क्रमांक मिळवला. तर सौम्यदीप प्रधानने 484 गुणांसह तिसरं स्थान मिळवलं. CBSE 10th result 2018 : दहावीचा निकाल जाहीर 16 लाखांहून जास्त विद्यार्थ्यांची परीक्षा 5 मार्च ते 12 एप्रिल या काळात देशभरातील 453 केंद्रांवर सीबीएसई दहावीची परीक्षा घेण्यात होती. तर परदेशात दहावी इयत्तेचे एकूण 78 परीक्षा केंद्र होते. यंदा एकूण 16,38, 428 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती, ज्यात मुलींची संख्या 6,71, 103 आणि मुलांची संख्या 9,67,325 होती. निकाल कुठे पाहता येणार? विद्यार्थ्यांना या परीक्षेचा निकाल सीबीएसईच्या cbse.nic.in या अधिकृत वेबसाईटसह cbseresults.nic.inresults.nic.in आणि results.gov.in वर पाहता येणार आहे. निकाल कसा पाहावा?
  • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईची अधिकृत वेबसाईट cbse.nic.in  वर क्लिक करा
  • इथे तुम्हाला 10 वी आणि 12 वी असे पर्याय दिसतील, त्यापैकी तुम्हाला कोणता निकाल पाहायचा आहे तो निवडा.
  • 10 वीचा निकाल पाहण्यासाठी CBSE 10th result 2018 वर क्लिक करा.
  • तुमचं नाव, नंबर वगैरे माहिती भरल्यानंतर दहावीचा निकाल दिसेल.
  • पुढील वापरासाठी तुम्ही निकालाची प्रत डाऊनलोड करु शकता.
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nilesh Lanke Tractor Rally | खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर रॅली!  ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 07 July 2024Raju Waghmare : Worli Hit and Run प्रकरण दुर्दैवी, CM Eknath Shinde कुणाला पाठीशी घालणार नाहीतNana Patole on Shikhar Bank Scam : भाजपने घोटाळेबाजांना सोबत घेतल्यामुळे जनतेच्या मनात उद्रेक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Embed widget