ABP Opinion Poll: अर्थसंकल्पामुळे पाच राज्यात भाजपाला फायदा होईल का? जनतेनं दिलं चकित करणारं उत्तर
ABP CVoter Survey for Election 2022 : उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडसह पाच राज्यांच्या निवडणुकीदरम्यान मंगळवारी केद्रीय मंत्री सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला.
ABP CVoter Survey for Election 2022 : उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडसह पाच राज्यांच्या निवडणुकीदरम्यान मंगळवारी केद्रीय मंत्री सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पाला पुढील 25 वर्षाचा ब्लू प्रिंट असल्याचं सांगितलं. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया येत आहेत. पण पाच राज्यांच्या निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे भाजपला फायदा होईल का? हा प्रश्न सर्वांना पडला असेल. त्यामुळेच एबीपीने सी वोटरच्या माध्यमातून सर्व्हे घेत जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूज सी वोटरच्या माध्यमातून वारंवार पाच राज्यातील जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. दैनिक आणि साप्ताहिक सर्व्हेच्या माध्यमातून विविध विषयावर जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातोय. अशातच आज जाहीर झालेल्या अर्थसंकल्पाबाबतची एबीपीने जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पाच राज्यांच्या निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे भाजपला फायदा होईल का? असा प्रश्न विचारत लोकांचा कौल जाणून घेतला आहे. यामध्ये जनतेनं चकीत करणारी उत्तरं दिली आहेत.
पाच राज्यांच्या निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे भाजपला फायदा होईल का? या प्रश्नावर 45 टक्के लोकांनी हो असे उत्तर दिले आहे. तर 39 टक्के लोकांना पाच राज्यात भाजपला या अर्थसंकल्पाचा फायदा होणार नसल्याचे वाटतेय. तर 16 टक्के लोकांनी माहित नसल्याचे उत्तर दिलेय.
अर्थसंकल्पामुळे पाच राज्यात भाजपाला फायदा होईल का?
होय - 45 टक्के
नाही -39 टक्के
माहित नाही -16 टक्के
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेत्यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे, तर काही नेत्यांनी या अर्थसंकल्पाचे समर्थन केले आहे. या अर्थसंकल्पावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टीका केली आहे. या अर्थसंकल्पाने जनतेची निराशा केली असल्याचे केजरीवाल म्हणालेत. केजरीवाल यांनी ट्वीट करत अर्थसंकल्पावर टीका केली आहे. सध्या देशावर कोरोनाचे मोठे संकट आहे. या संकटात अर्थसंकल्पातून जनतेला दिलासा मिळेल असे वाटत होते, मात्र, अर्थसंकल्पातून जनतेची निराशा झाली असल्याचे केजरीवाल म्हणाले. सामान्य जनतेसाठी या अर्थसंकल्पात काहीही करण्यात आले नाही. भाजपच्या नेत्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे, तर विरोधकांनी या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी देखील या अर्थसंकल्पावर टीका केली आहे.