एक्स्प्लोर

Bhopal Gas Tragedy : भोपाळमधील 'ती' काळरात्र! 37 वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेमागची कारणं...

Bhopal Gas Tragedy : भोपाळ गॅस दुर्घटनेला 37 वर्षे पूर्ण झाली. 2 डिसेंबर 1984 च्या मध्यरात्री घडलेल्या दुर्घटनेच्या जखमा आजही ताज्या आहेत. जगातील औद्योगिक इतिहासातील ही सर्वात मोठी दुर्घटना होती.

Bhopal Gas Tragedy : भोपाळ गॅस दुर्घटनेला 37 वर्षे पूर्ण झाली. 2 डिसेंबर 1984 च्या मध्यरात्री घडलेल्या दुर्घटनेच्या जखमा आजही ताज्या आहेत. जगातील औद्योगिक इतिहासातील ही सर्वात मोठी दुर्घटना होती. मध्य प्रदेशातील भोपाळमधील युनियन कार्बाईड या कीटकनाशक निर्मिती करणाऱ्या कारखान्यामधून मिथाईल आयसोसायनेट (MIC) या विषारी वायूची गळती झाली. या दुर्घटनेनं त्या दिवसापासून आतापर्यंत हजारोंचा जीव घेतलाय. युनियन कार्बाईडच्या प्लांट - सीमध्ये पहाटे गॅस गळती सुरू झाली आणि वाहत्या वाऱ्यासोबत हा विषारी गॅस भोपाळ शहरात पसरला आणि गाढ झोपेतील लोकांचा बळी गेला. लोक श्वास घेण्यासाठी तडफडू लागले. युनियन कार्बाईड फॅक्टरीतून सुमारे 40 टन वायूची गळती झाली होती. 

2 डिसेंबर 1984 च्या पहाटे झालेल्या विषारी वायूच्या गळतीने होत्याचं नव्हतं झालं. सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार गॅस दुर्घटनेत काही तासांमध्येच जवळपास 3,000 लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र, विनासरकारी स्रोतांच्या माहितीनुसार या दुर्घटनेत सुमारे 25 ते 30 हजार लोकांचा बळी गेला. एवढंच नाही मृत्यूचं हे सत्र पुढील अनेक वर्षे सुरु होतं. त्यानंतरही मागील 35 वर्षात अनेक लोकांचा बळी गेला आणि कित्येक माणसं अपंग झाली.

कशी घडली दुर्घटना?
मिथाईल आयसोसायनाईट (MIC) या विषारी रसायनाचा वापर कीटकनाशके आणि प्लास्टिक निर्मिती करण्यासाठी वापरले जाते. MIC द्रवरुपात थंड वातावरणात हातळला जातो. या रसायनाचा पाण्याशी संपर्क आल्यास रासायनिक अभिक्रिया होऊन विषारी वायू तयार होतो. युनियन कार्बाईड कारखान्यातील 610 क्रमांकाच्या टाकीतील मिथाईल आयसोसायनाईटचा पाण्याशी संपर्क आला. कारखान्यातील कामगाराने या टाकीवर बसवलेल्या व्हाल्व्हच्या पुढील पाईप पाण्याने धुण्यासाठी पाण्याची नळी व्हाल्व्हपुढच्या नळीला जोडली होती. व्हाल्व्ह गळका असल्याने त्यातून पाणी टाकीत गेले. त्यामुळे रासायनिक अभिक्रिया होऊन टाकीचे तापमान आणि दाब वाढू लागल्याने सेफ्टी व्हॉल्ह उघडून विषारी वायूची गळती झाली. 

हजारो निरपराध लोकांचा बळी
विषारी वायूची गळती झाली तेव्हा भोपाळ आणि आसपासच्या शहरातील लोक गाढ झोपेत होते. विषारी वायूमुळे त्यांचा जीव कासावीस व्हायला लागला. श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यानं लोक तडफडू लागले. काहींचा झोपेतच मृत्यू झाला तर काहीजण कसेतरी रुग्णालयात पोहोचले. मात्र रुग्णालयात काय उपचार करावेत हेच डॉक्टरांना माहित नव्हते. त्यानंतर संपूर्ण भोपाळमध्ये माणसांसह जनावरांच्या मृतदेहांचा खच पडला. या घटनेची दाहकता इतकी होती की, या दुर्घटनेचा त्रास त्यानंतर जन्मलेल्या तिसऱ्या पिढीतील लोकांपर्यंत पोहोचला. अनेकांना अपंगत्व, अंधत्व आलं. 

भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात योग्य उपाययोजना करणं गरजेचं आहे.

Bhopal Gas Tragedy : भोपाळमधील 'ती' काळरात्र! 37 वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेमागची कारणं...

महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इराणमध्ये एक फोटो क्लिक अन दोन महिने बंदिस्त, भारतात परतलेल्या योगेशने घडलं ते सगळं सांगितलं!
इराणमध्ये एक फोटो क्लिक अन दोन महिने बंदिस्त, भारतात परतलेल्या योगेशने घडलं ते सगळं सांगितलं!
Shirish More : संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराजांनी देहूत गळ्याला दोरी लावली, आयुष्य संपवलं
संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराजांनी देहूत गळ्याला दोरी लावली, आयुष्य संपवलं
Hingoli News: व्यवसायासाठी इराणला गेला, एक फोटो क्लिक केला अन् योगेश जेलमध्ये अडकला; दोन महिन्यांनी अखेर...
व्यवसायासाठी इराणला गेला, एक फोटो क्लिक केला अन् योगेश जेलमध्ये अडकला; अखेर...
Video: ''मी जिवंत राहिल किंवा नाही राहील, पण...''; मुख्यमंत्री फडणवीसांसमोर सुरेश धसांची तुफान फटकेबाजी
Video: ''मी जिवंत राहिल किंवा नाही राहील, पण...''; मुख्यमंत्री फडणवीसांसमोर सुरेश धसांची तुफान फटकेबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Modi Amrutsnan : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महाकुंभमेळ्यात अमृतस्नानABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 05 February 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्सSanjay Raut Delhi : महाकुंभमधील घटनेवर मला बोलू दिलं नाही,माईक बंद केला..-राऊतSuresh Dhas On Santosh Deshmukh : आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इराणमध्ये एक फोटो क्लिक अन दोन महिने बंदिस्त, भारतात परतलेल्या योगेशने घडलं ते सगळं सांगितलं!
इराणमध्ये एक फोटो क्लिक अन दोन महिने बंदिस्त, भारतात परतलेल्या योगेशने घडलं ते सगळं सांगितलं!
Shirish More : संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराजांनी देहूत गळ्याला दोरी लावली, आयुष्य संपवलं
संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराजांनी देहूत गळ्याला दोरी लावली, आयुष्य संपवलं
Hingoli News: व्यवसायासाठी इराणला गेला, एक फोटो क्लिक केला अन् योगेश जेलमध्ये अडकला; दोन महिन्यांनी अखेर...
व्यवसायासाठी इराणला गेला, एक फोटो क्लिक केला अन् योगेश जेलमध्ये अडकला; अखेर...
Video: ''मी जिवंत राहिल किंवा नाही राहील, पण...''; मुख्यमंत्री फडणवीसांसमोर सुरेश धसांची तुफान फटकेबाजी
Video: ''मी जिवंत राहिल किंवा नाही राहील, पण...''; मुख्यमंत्री फडणवीसांसमोर सुरेश धसांची तुफान फटकेबाजी
Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, वेगवान कारचं एक्सेल तुटलं अन्...
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, वेगवान कारचं एक्सेल तुटलं अन्...
Suresh Dhas: सुरेश धसांनी देवेंद्र फडणवीसांना बिनजोड पैलवान म्हटलं, धनंजय मुंडेंवर थेट हल्ला चढवला
आष्टीत देवेंद्र सुरेश धसांचं दणदणीत भाषण; फडणवीसांना म्हणाले, बाहुबली अन् बिनजोड पैलवान
Pandharpur News: राज ठाकरेंच्या नेत्याने पंढरपूरजवळ बांधलं मुंबईच्या थाटाला लाजवणारं हॉटेल, पाहा PHOTO
राज ठाकरेंच्या नेत्याने पंढरपूरजवळ बांधलं मुंबईच्या थाटाला लाजवणारं हॉटेल, पाहा PHOTO
पंकजा मुंडे अन् सुरेश धस एकाच मंचावर; मुख्यमंत्री फडणवीसांकडून बीडमध्ये विकासकामांचा शुभारंभ
पंकजा मुंडे अन् सुरेश धस एकाच मंचावर; मुख्यमंत्री फडणवीसांकडून बीडमध्ये विकासकामांचा शुभारंभ
Embed widget