इराणमध्ये एक फोटो क्लिक अन दोन महिने बंदिस्त, भारतात परतलेल्या योगेशने घडलं ते सगळं सांगितलं!
नांदेडच्या वसमत येथील योगेश पांचाळने त्याच्यासोबत असं काही घडेल याचा स्वप्नातही विचार केला नसेल. योगेश आणि पत्नी श्रद्धा या दाम्पत्यानी दोन महिन्यांत काय-काय अडचणींचा सामना केला ते सांगितले.

Detention In Iran : इराणमध्ये एका भारतीय व्यक्तीकडून प्रतिबंधात्मक परिसरात एक फोटो चुकून क्लिक होतो, मग तो फोटो भारतात असलेल्या पत्नीला सेंड होतो. दुसऱ्या दिवशी पत्नीशी बोलत असताना इराणचे पोलीस राहत्या हॉटेलमध्ये येतात. पत्नीशी बोलणं सुरु असतानाच पोलीस त्याला ताब्यात घेतात. डोळ्याला पट्टी बांधून त्याला बंदिस्त ठिकाणी नेहलं जातं. कसून चौकशी सुरु होते. भारतात राहणाऱ्या कुटुंबाला याची पुसटशी कल्पनाही नसते. थेट 55 दिवसांनी पतीचा पत्नीला फोन येतो अन सुखरुप असून चार दिवसांत घरी परतत असल्याचा निरोप येतो. एखाद्या चित्रपटाला साजेशी असणारी ही सत्य घटना आहे. योगेश पांचाळसोबत ही घटना घडली आहे.
योगेशने सांगितला घडलेला प्रकार
योगेश पांचाळ मायदेशी परतल्यानंतर एबीपी माझाने घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. नांदेडच्या वसमत येथील योगेश पांचाळने त्याच्यासोबत असं काही घडेल याचा स्वप्नातही विचार केला नसेल. योगेश आणि पत्नी श्रद्धा या दाम्पत्यानी दोन महिन्यांत काय-काय अडचणींचा सामना केला ते सांगितले. योगेशची पत्नी श्रद्धाने सुद्धा योगेशशी संपर्क तुटताच कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला याची माहिती सांगितली. योगेशशी संपर्क होत नसल्याचे दिसून येताच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधून योगेशची माहिती घेण्याचा प्रयत्न केल्याचे श्रद्धाने सांगिततले.
चौकशी पूर्ण केल्यानंतर त्यांनीच एअरपोर्टला सोडले
योगेशचा एकूण पाच दिवसांचा इराण दौरा होता. डिसेंबर महिन्यात पाच तारखेला तो इराणमध्ये पोहोचला. इराणमध्ये पोहोचल्यानंतर एका टूरिस्ट ठिकाणी गेला होता. यानंतर त्याठिकाणी फोटोसेशन केल्यानंतर तो हाॅटेलमध्ये परतला. त्यानंतर योगेशने फोटो घरी पत्नीकडे पाठवले होते. दुसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास इराण पोलिस घरी पोहोचल्याचे तो म्हणाला. यावेळी त्यांनी ताब्यात घेत डिटेंशन नेल्याचे योगेशने सांगितले. तब्बल 59 दिवस योगेश इराण पोलिसांच्या ताब्यात होता. या दरम्यान, शरीराला कोणताही स्पर्श न करता माहिती घेतल्याचे सांगितले. प्रतिबंधित भागात गेल्याने चौकशी झाल्याचे योगेशने सांगितले. चौकशी पूर्ण केल्यानंतर त्यांनीच एअरपोर्टला सोडल्याचे तो म्हणाला. या कालावधीत कोणत्याही प्रकारचा कुटुंबाशी संपर्क झाला नसल्याचे सांगितले. एका व्यवसायाच्या निमित्ताने इराणला गेल्याचे योगेशने साांगितले.
इराण गेल्यानंतर तीन दिवस योगेश पत्नी श्रद्धाच्या संपर्कात होता. मात्र, त्यानंतर कोणताच संपर्क झाला नाही. आम्ही दोन दिवसांची वाट पाहून दुतावासाकडे संपर्क केल्याचे सांगितले. 11 डिसेंबरला रिटर्न तिकिटची कोणतीच माहिती न मिळाल्याने अशोक चव्हाण यांची भेट घेतली. त्यानंतर आम्ही चव्हाण यांच्या सल्ल्याने मुंबईत जाऊन योगेशच्या परतीसाठी प्रयत्न केल्याचे सांगितले. मित्राच्या माध्यमातून इराणमध्ये चौकशी केली असता ताब्यात घेतल्याचे सांगितले. 2 फेब्रुवारी रोजी परतून योगेशचा फोन आल्याचे श्रद्धाने सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
























