Omicron Variant Cases in India : भारतात ओमिक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव, कर्नाटकात व्हेरियंटचे दोन रुग्ण
देशात ओमिक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव झाला असून कर्नाटकात ओमिक्रॉनचे (omicron variant) दोन रुग्ण आढळले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज पत्रकार परिषदेत ही बातमी दिली आहे.
Omicron Variant In India: : गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या (coronavirus) संकटाची चिंता सतावत असतानाच आता कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटने (omicron variant) आणखी चिंतेत भर घातली आहे. देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटता शिरकाव झाला असून कर्नाटकात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज पत्रकार परिषदेत ही बातमी दिली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगातील 29 देशात 373 ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहे. ओमिक्रॉन व्हेरियंट बीटा आणि डेल्टा व्हेरियंटपेक्षा जास्त वेगाने पसरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, ओमिक्रॉनचे व्हेरियंटमध्ये आतापर्यंत 42 ते 52 म्युटेशन आढळळे आहे. आतापर्यंत आलेल्या अहवाला नुसार हा ओमिक्रॉनचा व्हेरियंट जास्त तीव्रतेचा नाही.
डब्ल्यूएचओने आज सकाळी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेतील काही अहवालांवरून ओमिक्रॉन व्हेरियंट हा डेल्टापेक्षा जास्त प्राणघातक नाही. ओमिक्रॉनमुळे आफ्रिकेत आतापर्यंत एकही मृत्यू झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध मागे घेण्यास हरकत नसल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.
दक्षिण आफ्रिकेतील रुग्णालये आणि डॉक्टरांच्या मते, ओमिक्रॉनच्या रूग्णांना तीव्र डोकेदुखी, मळमळ, चक्कर येणे अशी लक्षणे दिसत आहेत. परंतु, ही लक्षणे गंभीर नसून ती अतिशय सौम्य आहेत. दरम्यान, ओमिक्रॉन व्हेरियंटच्या बातम्यांमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच यूके, यूएस, ईयू, इस्रायल, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांनी दक्षिण आफ्रिकन राष्ट्रांतून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घातले आहेत.
दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. अँजेलिक कोएत्झी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमिक्रॉन व्हेरियंट हा जास्त धोकादायक नसून त्याची तक्षणेही तीव्र नाहीत. परंतु, काही देशांनी विनाकारण अपप्रचार करून भीती निर्माण केली आहे. त्यामुळे ओमिक्रॉन व्हेरियंटला घाबरण्याचे कारण नाही.
संबंधित बातम्या :