एक्स्प्लोर

रेल्वेमध्ये प्रवासासाठी आरोग्य सेतू अॅप बंधनकारक, आवाहनानंतर मध्यरात्री अचानक सक्ती

आरोग्य सेतू हे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी वापरलं जाणारं अॅप आहे. यात ब्लू टुथ, जीपीएस लोकेशन तंत्रज्ञानाचा वापर करुन तुम्ही कोरोना बाधितांच्या संपर्कात आहात की नाहीत याचा अलर्ट दिला जातो.

नवी दिल्ली : लॉकडाऊननंतर बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रेल्वेची वाहतूक प्रायोगिक पातळीवर का होईना पण सुरू होत आहे. देशात 15 मार्गावरच्या तीस ट्रेन धावणार आहेत. पण या प्रवासाच्या सुरुवातीलाच रेल्वेच्या एका निर्णयानं संभ्रम निर्माण झाला आहे. आरोग्य सेतू हे कोरोनाच्या संकटकाळात तयार झालेलं मोबाईल अॅप हे रेल्वेनं प्रवासासाठी बंधनकारक केलं आहे. रेल्वेची ही सक्ती अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. रेल्वेनं प्रवास करायचा असेल तर आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड केलंच पाहिजे, असं फर्मान रेल्वे मंत्रालयाकडून निघालं आहे. आजपासून देशात 15 मार्गावरची वाहतूक प्रायोगिक तत्वावर सुरु होत आहे. या प्रवासासाठी ही सक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी (12 मे) 15 मार्गावरची जी प्रायोगिक वाहतूक सुरू झाली आहे. त्याबद्दल सोमवारी (11 मे) रेल्वेची नियमावली संध्याकाळी चारच्या सुमारास आली. त्यात सुरुवातीला हे अॅप बंधनकारक नव्हतं, तर केवळ नागरिकांना हे अॅप डाऊनलोड करण्याचा सल्ला होता. संपूर्ण नियमावलीत अगदी शेवटून दुसरा हा सल्ला होता. पण रात्री अचानक घडामोडी बदलल्या आहे. मध्यरात्री 12 वाजून 24 मिनिटांनी रेल्वे मंत्र्यांच्या ट्विटवरुन जाहीर करण्यात आलं की, हे अॅप प्रवासासाठी बंधनकारक असेल. ही अचानक झालेली घडामोडी रेल्वेतल्या काही अधिकाऱ्यांसाठी सुद्धा आश्चर्यकारक होती. कारण तोपर्यंत अनेक लोकांनी 12 ते 17 मे या प्रवासाची तिकीट ऑनलाईन बुक करुनही ठेवली होती. ज्या लोकांना तिकीट बुक करताना याची कल्पनाच नव्हती त्यांचं काय? मजुरांसाठी चालणाऱ्या श्रमिक स्पेशल ट्रेनसाठी ही सक्ती नाही. पण तरीही इतर प्रवाशांमधले काही सगळेच श्रीमंत वर्गातले नाहीत. त्यामुळे रेल्वेच्या झोनल पातळीवर याची अंमलबजावणी कशी करायची याबाबत संभ्रम आहेत. Lockdown 3 | Aarogya Setu App | रेल्वे प्रवासावेळी प्रवाशाकडे आरोग्य सेतू अॅप बंधनकारक आरोग्य सेतू हे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी वापरलं जाणारं अॅप आहे. यात ब्लू टुथ, जीपीएस लोकेशन तंत्रज्ञानाचा वापर करुन तुम्ही कोरोना बाधितांच्या संपर्कात आहात की नाहीत याचा अलर्ट दिला जातो. या अॅपवरुन मिळणारा डेटा हा कोरोना बाधितांच्या सरकारी डेटाशी तुलना करुन असे अलर्ट दिले जातात. पण या अॅपच्या सुरक्षेबाबत अनेक सायबर तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. अशा पद्धतीचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अॅप चायना, सिंगापूर, दक्षिण कोरियातही वापरण्यात आले आहेत. पण केवळ या अॅपमुळे कोरोना प्रादुर्भाव रोखणं यशस्वी झाल्याचं उदाहरण नाही. कारण सगळ्यात महत्वाची असते ग्राऊंडवर काम करणारी यंत्रणा आणि तीच वेगानं प्रतिसाद देणार नसेल तर अशा अॅपचा काय फायदा होणार आहे. त्यातही सगळ्यात महत्वाचा फरक बाकी कुठल्याच देशात असं अॅप बंधनकारक नाही, तर ते ऐच्छिक आहे. संबंधित बातम्या :

Coronavirus | पंजाबमधील लुधियानात RPF चे 14 जवान कोरोना पॉझिटिव्ह; श्रमिक ट्रेनमध्ये होते तैनात

महत्त्वाच्या बातम्या

Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Election : सोशल मीडियावर 21 लाख फॉलोअर्स,गावातील निवडणुकीत फक्त 33 मतं मिळाली, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा मोठा पराभव
सोशल मीडियावर 21 लाख फॉलोअर्स,गावातील निवडणुकीत फक्त 33 मतं मिळाली, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा पराभव
Ayodhya Ram Mandir : रामभक्तांसाठी महत्त्वाची बातमी! 1 नोव्हेंबरपासून अयोध्येतील राम मंदिर दर्शनाच्या वेळेत मोठा बदल; जाणून घ्या नवीन वेळापत्रक
रामभक्तांसाठी महत्त्वाची बातमी! 1 नोव्हेंबरपासून अयोध्येतील राम मंदिर दर्शनाच्या वेळेत मोठा बदल; जाणून घ्या नवीन वेळापत्रक
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Embed widget