एक्स्प्लोर
ऑक्सफर्ड डिक्शनरीत आता आधार, डब्बा, हरताल यांसह 26 भारतीय शब्दांचा समावेश
ऑक्सफर्ड डिक्शनरीत आता 26 नव्या भारतीय शब्दांची भर पडली आहे. यामध्ये आधार, चॉल, डब्बा, हरताल आणि शादी या शब्दांचा समावेश आहे.
नवी दिल्ली : ऑक्सफर्ड दरवर्षी आपल्या डिक्शनरीमध्ये नेहमी काही शब्द समाविष्ट करत असते. यावर्षीही काही शब्दाचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये आधार, डबा, चॉल, हडताल आणि शादी इत्यादी शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. आज ऑक्सफर्ड डिक्शनरीची नवी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली आहे.
ऑक्सफर्ड डिक्शनरीची आजची दहावीआवृत्ती आहे. नव्या डिक्शनरीत 384 नवे भारतीय शब्द सामील करण्यात आले आहेत. जगभरातील विविध भाषांमधील एक हजार शब्दांचा या नव्या डिक्शनरीत समावेश करण्यात आला आहे. चॅटबॉट, फेकन्यूज आणि मायक्रोप्लास्टिक या शब्दांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीत भाषांमधील बदलांवर नेहमीच लक्ष ठेवलं जातं. त्यानुसार नव्या शब्दांना नव्या आवृत्तीमध्ये स्थान दिलं जातं, असं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने म्हटलं आहे.
ऑक्सफर्डने आपल्या वेबसाइटवर ऑडिओ-व्हिडिओ ट्यूटोरियलचं अॅडव्हान्स फिचर्स दिले आहेत. या नव्या आवृत्तीत 26 नव्या भारतीय शब्दांचा समावेश करण्यात आला असून त्यातील 22 शब्द प्रिंटेड डिक्शनरीत असणार आहेत.
बस स्टँड, डिम्ड युनिव्हर्सिटी, एफआयआर, नॉन व्हेज, रिड्रेसल, टेम्पो, ट्यूबलाइट, व्हेज, व्हिडिओग्राफी आदी शब्दांचा डिक्शनरीत समावेश आहे. लूटर, लिटिंग आणि अपजिल्हा आदी शब्दांचा डिक्शनरीच्या ऑनलाईन व्हर्जनमध्ये समावेश करण्यात आला आहे. अच्छा, अन्ना, गुलाब जामून, मिर्च मसाला, गोश्त, कीमा, नोटाबंदी, आधार, स्वच्छ, योग आणि बाहुबली या शब्दांचा ऑक्सफर्ड डिक्शनरीत समावेश करण्यात आला आहे.
काही प्रमुख शब्द
अन्ना, बडा दिन, बापू, बस, भवन, भिंडी, चाचा, चक्का जाम, चमचा, चौधरी, छी-छी, चूप, दादागिरी, देश, देवी, दीदी, दिया, दम, फंडा, गोष्त, गुलाबजाम, गली, हाट, जय, झुग्गी, जी, जुगाड, खीमा (कीमा), कुंड, महा, मिर्च, मिर्च मसाला, नगर, न्हाई, नमकीन, नाटक, निवास, किला, सेवक, सेविका, टप्पा, टाईमपास, उद्योग, वडा..
संबंधित बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement