एक्स्प्लोर
नोटाबंदी, 'विकास'वर 'आधार'ची मात, ऑक्सफर्ड डिक्शनरीत समावेश
जयपूर साहित्य संमेलनात आधार या शब्दाला ‘हिंदी वर्ड ऑफ दी इयर’ घोषित करण्यात आलं.
जयपूर : विकास आणि नोटाबंदी शब्दाला मागे टाकत आधार शब्दाने ऑक्सफर्ड डिक्शनरीत स्थान मिळवलं आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीतर्फे राजस्थानमध्ये सुरु असलेल्या जयपूर साहित्य संमेलनात आधार या शब्दाला ‘हिंदी वर्ड ऑफ दी इयर’ घोषित करण्यात आलं.
गेल्या वर्षी आधार आणि विकास या दोन शब्दांची बरीच चर्चा झाली आणि दोन्ही शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या स्पर्धेत आले. पण इथे मोदी सरकारच्या आधारलिंकच्या बातम्यांची चर्चा पाहता आधार शब्दाने बाजी मारली आणि त्यामुळे 2017 सालासाठी हा मान ‘आधार’ या शब्दाला मिळाला आहे.
गेल्या वर्षी सर्वात जास्त चर्चा झालेला आणि जनतेचे लक्ष वेधून घेणाऱ्या शब्दाचीच निवड समितीने निवड केली. या नोटाबंदी, आधार, स्वच्छ, योग आणि बाहुबली या शब्दांचा समावेश होता. निवड समितीने आधार या सर्वाधिक चर्चेत असलेल्या शब्दाची निवड केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement