(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aadhaar Voter ID linking : तुमचे मतदान ओळखपत्र आधारशी लिंक करा! घर बसल्या देखील करू शकता हे काम
Aadhaar Voter ID linking : आधार कार्डला मतदान ओळखपत्र लिंक करण्यास सुरूवात झाली आहे. मतदारांची ओळख पटवण्यासाठी आणि मतदार यादीतील डुप्लिकेशन टाळण्यासाठी मतदार ओळखपत्र आधारशी जोडले जात आहे.
Aadhaar Voter ID linking : देशभरातील संपूर्ण राज्यांमध्ये आता आधार कार्डला मतदान ओळखपत्र लिंक करण्यास सुरूवात झाली आहे. मतदारांची ओळख पटवण्यासाठी आणि मतदार यादीतील डुप्लिकेशन टाळण्यासाठी मतदार ओळखपत्र आधारशी जोडले जात आहे. आधार कार्डला मतदान ओळखपत्र लिंक करण्यासाठी मतदान कार्ड, आधार कार्ड आणि मोबाईल नंबरची आवश्यकता आहे. ही कागदपत्रे असल्यानंतर voter Helpline app द्वारे आधार नंबर आणि मोबाईल नंबर आपल्या स्वतःच्या मोबाईल वरून ऑनलाईन करता येत आहे. राज्यातील प्रत्येक मतदान केंद्र आणि मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात देखील तुमचे मतदान ओळखपत्र आधार कार्डसोबत लिंक करून देण्यात येईल. त्यासाठीची मोहीम सध्या सुरू आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून त्यांच्या अधिकृत बेबसाईटवर ( https://ceo.maharashtra.gov.in/ ) देण्यात आली आहे. यासाठी 11 सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाकडून राज्यव्यापी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
घरबसल्याही करता येईल आधारला मतदान ओळखपत्र लिंक
1. सर्वप्रथम मतदार हेल्पलाइन अॅप डाउनलोड करा. हे Android आणि iOS दोन्ही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.
2. यानंतर इलेक्टोरल ऑथेंटिकेशन फॉर्म (फॉर्म 6बी) वर क्लिक करा आणि ते उघडा. त्यानंतर Let's Start वर क्लिक करा.
3. तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाका. हा क्रमांक आधार कार्डशी जोडलेला असणे आवश्यक आहे. नंबर टाकल्यानंतर त्यावर ओटीपी येईल.
4. तुम्हाला प्राप्त झालेला OTP एंटर करा आणि नंतर Verify वर क्लिक करा. त्यानंतर Yes I Have Voter ID वर क्लिक करून Next वर क्लिक करा.
5. यानंतर तुमचा मतदार आयडी क्रमांक (EPIC) टाका. तुमचे राज्य निवडा आणि Fetch details वर क्लिक करा. त्यानंतर Proceed वर क्लिक करून पुढे जा.
6. नंतर तुमचा आधार क्रमांक, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक,ऑथेंटिकेशनच्या ठिकाणी टाका आणि Done वर क्लिक करा.
7. शेवटी तुमच्या फॉर्म 6-B चे रिव्हीव हे पेज उघडेल. त्यात तुमची सर्व माहिती तपासल्यानंतर Confirm वर क्लिक करा. तुमचे आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र लिंक झाले असेल.
निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्याच्या योजनेवर 2015 मध्ये काम सुरू केले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने याला स्थगिती दिली होती. त्यानंतर 2019 मध्ये निवडणूक आयोगाने निवडणूक सुधारणांची शिफारस केली होती. निवडणूक सुधारणांसाठी गेल्या वर्षी केंद्र सरकारने निवडणूक कायद्यात सुधारणा करण्यासाठी विधेयक आणले होते. हे विधेयक आता कायदा झाला आहे. त्यामुळे मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. मतदार ओळखपत्र आधारशी लिंक केल्याने निवडणुकीतील हेराफेरी रोखण्यास मदत होईल.
अनेकवेळा अशी प्रकरणे समोर येतात, ज्यामध्ये एकाच व्यक्तीने अनेकवेळा आपले नाव मतदार यादीत नोंदवले, त्यामुळे निवडणुकीत गोंधळ उडतो. हा गोंधळ टाळण्यासाठी आधार कार्ड मोबाईल नंबरसोबत लिंक करायचा आहे.