7th Pay Commission: खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात मिळणार वाढीव पगार?
7th Pay Commission : मार्च महिन्याच्या पगारात केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव पगार मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार लवकरच कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीएमध्ये वाढ करण्याची घोषणा करणार आहे.
7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मार्च महिन्याच्या पगारात केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव पगार मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार लवकरच कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीएमध्ये वाढ करण्याची घोषणा करणार आहे. यासोबतच 18 महिन्यांपासून लांबलेल्या डीए थकबाकीचे पैसेही होळीच्या दिवशी या कर्मचाऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे.
तीन टक्के होणार वाढ
कंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात यावेळी तीन टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे 31 टक्के मिळणारा महागाई भत्ता यापुढे वाढून तो 34 टक्के मिळणार आहे.
AICPI Index च्या अंदाजानुसार, डिसेंबर 2021 च्या निर्देशांकात एका अंकाची घट झाली आहे. महागाई भत्त्याचा सरासरी निर्देशांक 351.33 एवढा राहिला आहे. त्यामुळे यंदा कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34.04 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.
34 टक्के होणार डीए
जर कर्मचाऱ्याचा मुळ पगार हा 18 हजार असेल तर त्याला 34 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. या हिशोबानेच तुमचा पगारात वार्षीक 73 हजार 440 रुपयां वाढ होवू शतके. त्यानुसार मुळ पगारात वार्षीक 6 हजार 480 रुपयांची वाढ हाईल.
सुत्रांच्या माहितीनुसार, सरकार मार्च महिन्यात वाढीव महागाई भत्त्याची घोषणा करू शकते. सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे आचार संहिता लागली आहे. त्यामुळेच सरकार लगेच याबाबतची घोषणा करू शकत नाही.
नॅशनल कौन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी (JCM) चे सचिव (स्टाफ साइड) शिव गोपाल मिश्रा यांच्या मते, 18 महिन्यांपासून रखडलेली डीएची थकबाकी सरकार एकावेळी देऊ शकते.
महत्वाच्या बातम्या
- Infosys Recruitment : मोठी संधी! इन्फोसिसमध्ये होणार 55 हजार जणांची नोकर भरती, सीईओ सलील पारेख यांची माहिती
- High Court: दहा वकिलांना मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी बढती, सर्वोच्च न्यायालयाच्या कोलॅजिअमची शिफारस
- Hijab Controversy : कर्नाटकमधील हिजाब वाद सुप्रीम कोर्टात, सरन्यायाधीश म्हणाले...
- Supreme Court : सुनावणीदरम्यान 'मुन्नाभाई MBBS'चा उल्लेख! जाणून घ्या काय आहे प्रकरण?