Infosys Recruitment : मोठी संधी! इन्फोसिसमध्ये होणार 55 हजार जणांची नोकर भरती, सीईओ सलील पारेख यांची माहिती
Infosys Recruitment : अभियांत्रिकी आणि विज्ञान शाखेच्या पदवीधारकांसाठी मोठी संधी आहे. देशातील सर्वात मोठी IT कंपनी असलेल्या इन्फोसिसमध्ये तब्बल 55 हजार नवीन लोकांची भरती होणार आहे.
Infosys Recruitment : देशातील सर्वात मोठी IT कंपनी असलेल्या इन्फोसिसमध्ये तब्बल 55 हजार नवीन लोकांची भरती होणार आहे. कंपनीचे सीईओ सलील पारेख यांनी याबाबत बुधवारी माहिती दिली आहे. या भरतीमध्ये अभियांत्रिकी आणि विज्ञान शाखेच्या पदवीधारकांना संधी मिळणार असल्याचे सीईओ पारेख यांनी सांगितले.
आयटी उद्योग लॉबी नॅसकॉमच्या वार्षिक NTLF कार्यक्रमाला सीईओ पारेख यांनी आज संबोधित केले. त्यावेळी या नोकरभरतीबाबत माहिती दिली. पारेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्ष 2022 साठी 55 हजार नवीन लोकांना इन्फोसिसमध्ये संधी देण्यात येणार आहे. शिवाय वर्ष 2023 मध्ये यापेक्षा जास्त लोकांची भरती करू, अशी माहिती सीईओ पारेख यांनी यावेळी दिली.
"इन्फोसिसने आर्थिक वर्ष 2022 मध्ये वार्षिक महसुलात 20 टक्के वाढ करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळेच नवीन व्यक्तींना कंपनीमध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे. इन्फोसिस कंपनी नोकरदारांच्या कौशल्यावर जास्त लक्ष केंद्रित करते. त्यासाठी नवीन भरती झालेल्या उमेदवारांना सहा ते 12 आठवड्यांपर्यंत प्रशिक्षण देण्यात येते, अशी माहिती सीईओ पारेख यांनी दिली.
"प्रशिक्षित म्हणून भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना दहा वर्षांत स्वत:च्या कौशल्यात वाढ करावी लागणार आहे. परंतु, तंत्रज्ञान सतत बदलत असल्याने तरुण पदवीधरांनी दर तीन ते पाच वर्षांनी स्वत:च्या कलागुणांना वाव देत नवीन कौशल्य प्राप्त केले पाहिजे. इन्फोसिसला भविष्यात वाढीसाठी खूप चांगली संधी आहे. याबरोबरच भविष्यातील कामांसाठी कुशल कर्मचार्यांवर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे सीईओ पारेख यांनी सांगितले.
"ग्राहकांसाठी मोठ्या प्रमाणावर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन हाती घेऊन काम केल्यामुळे कंपनी विक्रेत्यांसह आणि इतर भागधारकांसोबत काम करण्यास तयार आहे. ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक क्लाउड, खासगी क्लाउड आणि प्लॅटफॉर्मला सेवा कार्य म्हणून एकत्रित करू शकते," असे सीईओ पारेख म्हणाले.
संबंधित बातम्या :