एक्स्प्लोर

Voter Card : मतदार कार्डासोबत लिंक करा आधार क्रमांक, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

सदर आधार जोडणीचा उद्देश मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणीकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदार संघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदार संघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखणे आहे.

नागपूर : सध्या स्थितीला शहर किंवा रहिवासी पत्ता बदलला की जुने मतदार ओळखपत्र तसेच ठेवून अनेकांकडून नव्या ओळखपत्रासाठी अर्ज करण्यात येतो. मात्र याची केंद्रीय प्रणाली नसल्याने अनेकांकडे एकपेक्षा अधिक मतदार ओळखपत्र आहेत. त्यामुळे मतदार याद्यातील तपशिलाशी जोडण्याकरिता आणि प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून एच्छिकपणे आधारची माहिती संग्रहीत करणे बाबतच्या अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांच्या सूचना प्राप्त झालेल्या असून सदर सूचनांची अंमलबजावणीसाठी नागरिकांनी मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले. भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन, विधी व न्याय मंत्रालय यांचेद्वारा निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम, 2021 नुसार ही मोहीन राबविण्यात येत आहे.

मतदार यादीत असलेल्या प्रत्येक मतदाराकडून आधार क्रमांक विहीत स्वरुपात व विहीत रितीने मिळविण्यासाठी वैधानिकरित्या मतदार नोंदणी अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहेत. तसेच अधिसूचना 17 जून 2022 मध्ये निर्दिष्ट केल्यानुसार दि. 1 एप्रिल, 2023 पर्यंत किंवा तत्पूर्वी मतदार यादीत नाव असलेला प्रत्येक व्यक्ती त्याचा आधारक्रमांक अर्ज क्रं. 6 ब मध्ये भरुन देऊ शकतो. आवश्यक अर्ज क्रं. 6 ब च्या छापील प्रती मतदारांना उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच अर्ज क्रं. 6 ब मा. भारत निवडणूक आयोगाच्या eci.gov.in व मा. मुख्य  निवडणूक अधिकारी यांच्या https://ceoelection.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल.

मतदार यादीशी आधारक्रमांकाची जोडणी करणे ऐच्छिक आहे, केवळ आधार सादर करण्यास असमर्थतेमुळे मतदार यादीतून नाव काढून टाकली जाऊ शकत नाही. तरी मतदार यादीतील नावाशी दि. 1 ऑगस्ट 2022 पासून मोठ्या संख्येने आधार क्रमांकाची जोडणी करुन घेण्याबाबत सर्व मतदारांना आर. विमला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, नागपूर यांनी आवाहन केलेले आहे.

ऑनलाइनही करता येईल 'लिंक'

मतदारांना Online पद्धतीने आधारक्रमांक भरण्यासाठी अर्ज क्रं. 6 ब ERO Net, GARUDA, NVSP, VHA या माध्यमांवर देखील उपलब्ध करुन देण्यात येईल. सदर आधार जोडणीचा उद्देश मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणीकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदार संघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदार संघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखणे हा आहे. आधारक्रमांक सादर करणे हे मतदारांच्या वतीने ऐच्छिक आहे. अर्ज क्रं. 6 ब BLO यांचे मार्फतही घरोघरी भेटी देऊन गोळा करण्यात येईल. विशेष शिबिराच्या आयोजनामधूनही अर्ज क्रं. 6 ब गोळा करण्यात येईल. मतदारांकडे आधारक्रमांक नसल्यास अर्ज क्रं. 6 ब मध्ये दर्शविलेल्या 11 पर्यायी कागदपत्रापैकी एक कागदपत्र सादर करता येईल. उदा. पॅनकार्ड, फोटोसहीत किसान पासबुक, पासपोर्ट, इपिक कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, आरोग्य स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिग लायसन्स, फोटोसहीत पेन्शन कागदपत्रे, केंद्र व राज्य शासन कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागातील ओळखपत्र.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
Embed widget